जुन्या पेन्शन योजनेसाठी भोर तालुक्यातील सर्व शासकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांची व शिक्षक संघटना व समितीची वज्रमूठ कायम.

Maharashtra varta

 जुन्या पेन्शन योजनेसाठी भोर तालुक्यातील  सर्व शासकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांची  व शिक्षक संघटना व समितीची वज्रमूठ कायम.

भोर (प्रतिनिधी):-"पत्रकार पवार".

जुनी पेन्शन लागू करा यासाठी शिक्षकांनी व शासकीय व निमशासकीय कर्मचारी व अधिकारी  यांनी आजपासून पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होत भोर तालुक्यात 100% कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे दिसून आले.

१ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त राज्य सरकारी शिक्षकांसह सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी भोर तालुक्यातील २८४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ७००  हुन अधिक शिक्षक  व कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याने 100 टक्के संप भोर तालुक्यात यशस्वी झाला आहे. भोर तालुक्यातील शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांनी या संपात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे व पाठिंबा देखील या संपास दिला आहे, भोर तालुक्यातील शिक्षकांच्या विविध संघटना व समिती व इतर संघटनांनी देखील या बेमुदत संपात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आम्हाला जुनी पेन्शन द्या तरच हे बेमुदत संप थांबवू असे विचार शिक्षकांनी व्यक्त केले 

भोर पंचायत समिती समोर भोर तालुक्यातील 100 टक्के  शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करा असे म्हणत संपात 100 टक्के सामील होत भोर पंचायत कार्यालया समोर घोषणाबाजी  केली. यावेळी शेकडोहून अधिक शिक्षक उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी शिक्षकांच्या विचारांविरोधी भूमिका घेत संपातून माघार घेतली, मात्र महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील व तालुक्यातील याच शिक्षक संघाने संपात सक्रियपणे सहभागी राहणार असल्याचे सांगितले आहे. भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संघाच्या पत्रकाद्वारे असा निर्णय घेतला आहे की, राज्यसंघाने घेतलेल्या भूमिके संदर्भात भोर तालुक्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत, भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या भावनांचा विचार करून संपात पूर्ण पाठिंबा जाहीर करीत, असून पुणे जिल्हा शिक्षक संघाने सदर पाठिंबा जाहीर करून संपात सक्रिय होण्याची भूमिका घेतली आहे,

तसेच भोर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी आम्ही आग्रही भूमिका घेतलेली आहेत व या संपास आमचा शंभर टक्के पाठिंबा असून आम्ही याबाबत सक्रिय राहणार आहोत.

To Top