अतुल च्या हातून भविष्यातही असेच समाजकार्य चालू राहील:- छत्रपती उदयनराजे भोसले.
माळेगाव येथे माऊली अनाथालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण,आशा सेविका सन्मान व रक्तदान शिबिर आदी उपक्रम संपन्न.
नसरापूर (प्रतिनिधी):-
छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून युवा उद्योजक अतुल हिवाळे मित्र परिवार समूह यांनी माऊली अनाथाश्रम येथील 52 मुलांचा शैक्षणिक खर्च व वस्तूंचे वाटप, रक्तदान शिबिर उपक्रम घेण्यात आले. त्याच बरोबर कोविड कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बेधडकपणे पार पाडणाऱ्या आशा सेविका यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. अतुल हिवाळे यांच्या हातून भविष्यातही असेच समाजकार्य चालू राहील, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
माळेगाव ता. भोर येथे बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे माऊली अनाथाश्रम येथे अतुल हिवाळे मित्र समूहाच्या वतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, त्याप्रसंगी खासदार उदयनराजे बोलत होते.
यावेळी साताऱ्याचे मा. शिक्षण व अर्थ समिती सुनील काटकर,काका धुमाळ, उमेश मालुसरे, रवीराज घोरपडे, विक्रम घोरपडे,विनीत पाटील व अतुल हिवाळे मित्र समूहातील सर्व सदस्य मित्र परिवार व भोर वेल्हे ,हवेली तालुक्यातील,पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.तर प्रास्ताविक आदित्य बोरगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ह. भ. प. नवनाथ महाराज लिमण यांनी मानले.
माऊली अनाथाश्रम ची धुरा सांभाळणारे नवनाथ महाराज यांचे कौतुक करावे तेवढे कमीच कीर्तनाच्या माध्यमातून आज ते 52 अनाथ मुलांचा सांभाळ करत आहेत, आजच्या पिढीला बोध देण्याचे कार्य त्यांच्या हातून होत आहे त्यांच्या ओंझळ कधी रिकामी होणार नाही याची मला खात्री आहे. भविष्यात लागेल ती मदत आमच्या माध्यमातून पुरवण्याचे आश्वासन आज मी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने देतो.असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बोलताना सांगितले.

