श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माळेगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन.
पुणे( प्रतिनिधी):-न्यूज वार्ता नेटवर्क
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माळेगाव तालुका भोर येथे 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत माऊली अनाथाश्रम माळेगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्याची माहिती महाराष्ट्राचे युवा उद्योजक अतुल शेठ हिवाळे यांनी न्यूज वार्ता च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज असताना महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये उदयनराजे भोसले यांचे मोलाचे कार्य व योगदान आहे .त्यांचा जन्मदिवस हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे .त्या प्रसंगी औचित्य साधत माळेगाव तालुका भोर येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच शिवव्याख्यान, कोविड काळात उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य सेविकांचा सन्मान व स्नेहभोजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक अतुल शेठ हिवाळे मित्रपरिवाराने केलेले आहे.

