भोर तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी.

Maharashtra varta

 संत सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती नसरापूर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी.


भोर ( प्रतिनिधी) 

 संत सेवालाल महाराज यांनी मानवी मूल्याची जोपासना करण्यासाठी संत साहित्यातून समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विचार आजही समाजाला पोषक आहे त्यासाठी समाजाला एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन बंजारा समाज संघटनेचे नेते सुनील बिल्लू राठोड यांनी केले.

नसरापूर ता. भोर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.बंजारा सेवा संघाच्या वतीने नसरापूर व कामथडी ता .भोर  येथे संत सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नसरापूर ता.भोर गावातून दुचाकी व ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात आली.

 याप्रसंगी बोलताना बंजारा समाजाचे प्रमुख सुनील राठोड पुढे बोलताना म्हणाले की,जय सेवालाल महाराज हे आमचे दैवत आहे ,त्यांच्या विचारानुसार शिकवणी नुसार आम्ही आमचे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत,त्यांचे विचारांचे व कार्याचे आम्ही नेहमी पूजन  करत असतो. 

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त उद्योजक मोहन बापू वाल्हेकर यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळेस साळवडे गावचे मा. सरपंच दीपक भडाळे,पत्रकार व निवेदक विठ्ठल पवार,उद्योजक राजू पवार याप्रसंगी उपस्थित होते.

बंजारा समाज संघटनेचे नेते सुनील बिल्लू राठोड यांच्या नेतृत्वाखाली नसरापूर भागातून  जोरदार मिरवणूक  काढण्यात आली. जय सेवालाल महाराज, जय सेवालाल महाराज असा जयजयकार करण्यात आला.मेन आळी, बनेश्वर चौक,एस टी स्टँड चौक,चेलाडी,पवार वाडी, कामथडी येथे भव्य दिव्य मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर संत सेवालाल महाराज यांचे कार्य मा. सरपंच दीपक भडाळे यांनी मनोगतात व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील बिल्लू राठोड, आकाश सुनील राठोड, मोहन गोलू राठोड, अविनाश राठोड, सीता सुनील राठोड ,राहुल मोहन राठोड,श्रीमती पारूबाई मोहन राठोड व  बंजारा बांधव महिला- पुरुष आदींनी परिश्रम घेतले.


.संत सेवालाल जयंतीच्या मनःपूर्वक सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक:- सुनील बिल्लू राठोड व सर्व बंजारा समाज बांधव

To Top