निवेदक विठ्ठल पवार हे सोशल मीडियावर मोफत शिकवितायेत, सूत्रसंचालनाची सूत्रे .

Maharashtra varta

 निवेदक व सूत्रसंचालक ऑनलाइन मोफत मार्गदर्शन क्लासला उत्स्फूर्त प्रतिसाद.

निवेदक विठ्ठल पवार हे  सोशल मीडियावर मोफत शिकवितायेत, सूत्रसंचालनाची सूत्रे .



पुणे (प्रतिनिधी):- राम पाचकाळे

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी सोशल मीडियावर सूत्रसंचालन कसे करावे याबाबत मोफत मार्गदर्शन केले जाते आहे.निवेदक व सूत्रसंचालक होण्यासाठी ऑनलाइन मोफत मार्गदर्शन क्लासला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यातून या त्यांच्या या अनोख्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद व शुभेच्छा व अभिनंदन देखील होत आहे.

कोणताही कार्यक्रम असला की, त्या कार्यक्रमाचे यशस्विता म्हणजे उत्कृष्ट निवेदक तथा  निवेदन असते. अलीकडच्या काळात लोकप्रिय निवेदकांना कार्यक्रमात मोठी मागणी असल्याचे आपल्याला दिसून येते आहे. त्यात लोकप्रिय निवेदकास  बाजारपेठेमध्ये सर्वात मोठी मागणी  असते. पुणे, मुंबई ,ठाणे ,नागपूर औरंगाबाद ,सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात निवेदक व सूत्रसंचालन होण्यासाठी गलेलठ्ठ फी घेऊन क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या सर्वांच्या पलीकडे जात, सामाजिक बांधिलकी जपत, एकही रुपया न घेता पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी फेसबुक पेज व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून  सूत्रसंचालन कसे करावे , याबाबत दररोज मार्गदर्शन करत आहे. हजारो जण या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.


यामध्ये लग्न समारंभात कसे बोलावे. उपस्थितांचे स्वागत वधू-वरांना शुभेच्छा तसेच वधू-वरांना आशीर्वाद कसे द्यावेत, याबाबत नमुना पाठ त्यांनी फेसबुक पेज व इन्स्टा पेज वरती घेतले आहेत. दशक्रिया विधी मध्ये कोणते शब्द असावेत, कसे बोलावे याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर अचानक सूत्रसंचालन करायला लावले असता , त्यावेळेस कोणती खबरदारी घ्यावी. कोणती  महत्त्वाचे मुद्दे निवेदन करणारे यांनी लक्षात घ्यावे, याबाबत छोटे छोटे मार्गदर्शनपर व्हिडिओ त्यांनी बनवले आहेत. विविध समारंभात मान्यवर व उपस्थितांचे आगमन होत असते. यावेळेस वक्त्याने अथवा निवेदकाने कसे बोलावे, याबद्दल देखील उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले असल्याचे आपल्याला दिसून येते आहे. आगामी काळात ते सूत्रसंचालनाची ओळख, निवेदकामध्ये असणारे आवश्यक गुण, संपूर्ण निवेदक कसे बनावे ,बोल यशाचे व अनुभवाचे. विविध समारंभात सूत्रसंचालन कसे करावे, कार्यक्रमातील विविध घटकांवर निवेदकाने कसे बोलावे, याबाबत आदि घटकांवर आगामी काळात निवेदक विठ्ठल पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून  फेसबुक पेज व इंस्टावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन मोफत करणार आहेत.


निवेदक विठ्ठल पवार यांनी बोलताना सांगितले की,आज जग वेगानं पळू लागलं आणि सांस्कृतिक जगतातलं हवहवसं वाटणार वातावरण कमी होऊ लागलं. याचं कारण सुरस कार्यक्रमाची घटणारी संख्या हे आहे. त्याचबरोबर चांगले कार्यक्रम सूत्रसंचालनाच्या निकृष्टपणामुळे गोंधळाचे व रटाळपणाचे होत आहेत. चांगला निवेदक आज दुर्मिळ होतो आहे. लोकांना आजकाल वेळही अत्यंत अपुरा वाटत असल्याने थोडक्यात कार्यक्रम हे आजचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं .या निवेदकाची गरज मी स्वतः चांगलीच अनुभवली आहे. त्यामुळे भावी पिढीत चांगले निवेदक तयार व्हावेत म्हणून मी   सूत्रसंचालनाची सूत्रे सोशल मीडियावर सूत्रबद्ध करण्याचा घाट घातला आहे. समाधान ,यश कीर्ती याही क्षेत्रात आहे व अर्थाजनही आहे ,त्यासाठी व्हिडिओ पहा. फेसबुक पेजवर व इन्स्टावर आणि आचरा. कदाचित उद्याच्या एखाद्या निवेदकाला उमलायला. याच व्हिडिओच्या माध्यमातून फुंकर निमित्त ठरणार आहे. 


निवेदक विठ्ठल पवार यांची फेसबुक पेज लिंक:-

https://www.facebook.com/vitthalpawar0408?mibextid=ZbWKwL.

त्यांचे इंस्टाग्राम पेज लिंक:-

https://instagram.com/nivedak_vitthal_pawar?igshid=YmMyMTA2M2Y=अशी आहे,तरी आपण पेजला फॉलो,लाईक शेअर व कमेंट करावे, दररोज सूत्रसंचालन बाबत नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहावे.

To Top