स्थानिकांनो आजपासून टोल भरा...
टोल भरणे सक्तीचे.
टोल प्रशासनाचा फतवा
नसरापूर: विठ्ठल पवार.
खेड शिवापुर टोल नाक्यावर आज बुधवार दि. १ पासून भोर व वेल्हे तालुक्यातील सर्व स्थानिक वाहनांकडून एम एच 12 व एम एच 14 याच्याकडून टोल वसुली करण्यात येणार असल्याने स्थानिकांनाही आता टोल सक्तीने भरावा लागणार आहे. अशी माहिती टोलनाका व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
खेड शिवापुर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने १६ फेब्रुवारी २०२० ला आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस तात्पुरती स्थानिकांकडून टोल वसुली स्थगित करण्यात आली होती मात्र आता टोल प्रशासनाने एम एच 12 व एम एच 14 च्या वाहनधारकांना नवीन वर्षाची 2023 ची टोल वसुलीची सक्ती करत नवीन शुभेच्छा दिल्या आहेत. असे स्थानिक वाहन धारकांना बोलताना सांगितले.

