गावचा विकास आराखडा सर्वांगीण विकासाचे प्रतीक व्हावा:- गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे.

Maharashtra varta

 गावचा विकास आराखडा  सर्वांगीण विकासाचे प्रतीक व्हावा:- गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे.


नसरापूर( प्रतिनिधी):-

 भारताची राष्ट्रीय विकास ध्येय व सर्वांची योजना, सर्वांचा विकास किंवा सर्वांसोबत आणि सर्वांसाठी विकास ही धोरणे शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी अनुरूप अशीच आहेत. विविध संस्था ,संघटना खाजगी क्षेत्रे, तरुण समुदाय आणि घटकांशी समन्वयातून ही शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करणे, निश्चितच गावच्या विकास  आराखड्याच्या माध्यमातून शक्य होणार आहेत. गावच्या विकासाच्या बाबत शासन नियम, कायदे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी समजून घेऊन गावच्या विकासासाठी कटिबद्ध रहावे. काही वेळेस ग्रामपंचायत पदाधिकारी यांना शासन निर्णय बाबत अनभिज्ञ असतात, त्यामुळे ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्यात मतभेद होतो ,मात्र शासन सूचना व कार्यवाही हा शासन स्तरावरील महत्त्वाचा घटक हा ग्रामसेवक हे प्रभावी काम करत असतो, त्यांना नियमांची चौकट आहे, गावच्या विकासाची व्याख्या गावचे सरपंच व ग्रामस्तरीय पदाधिकारी यांनी विकास आराखड्यातून संपूर्ण गावच्या प्रत्येक घटकाचा विकास व्हावा,  गावचा विकास आराखड्यातून  गावच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन व्हावे असे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी केले.

वरवे तालुका भोर येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाना अंतर्गत पुणे जिल्हा परिषद पुणे व ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी फार्म पुणे यांचे संयुक्त विद्यमाने शाश्वत विकास ध्येय व स्थानिकीकरण अंतर्गत ग्रामस्तरीय पदाधिकारी व अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले, या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी धनवाडे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, शाश्वत विकास सशक्त पंचायत ची ध्येय ,उद्दिष्टे आपण लक्षात घेऊन विकास आराखड्याच्या माध्यमातून गावचा विकास साधावा. ते म्हणजे गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित व सामाजिक न्याय गाव, सुशासन गाव ,लिंग समभाव पोषक गाव महिला स्नेही, इत्यादी घटकांचा अंतर्भाव त्यामध्ये दिसून यावा.

या प्रसंगी भोर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय कुमार धनवटे, एच. जे. पवार ,मास्टर ट्रेनर प्रदीप पाटणकर, विस्तार अधिकारी डी. बी .पवार, दंडे मॅडम, वाघ भाऊसाहेब, सरपंच प्रतिनिधी वेळू गावचे सरपंच अमोल पांगारे, तेलवडी गावच्या सरपंच आरती धावले, ग्रामसेवक प्रतिनिधी भाऊसाहेब गेजगे,सुरेश वाघमारे, शिक्षक प्रतिनिधी संजय वाल्हेकर, बचत गट प्रतिनिधी चंदना शिंदे,सदस्य प्रतिनिधी मोहन इंदलकर,श्रीरंग कोंढाळकर, संगणक परिचालक रुबीना शेख,आशा सेविका सुरेखा धावले, व वेळू व नसरापूर गणाचे ग्रामस्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस मास्टर ट्रेनर प्रदीप पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.


"भोर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजयराव धनवटे म्हणाले की, गावच्या विकास आराखड्यातून गावच्या प्रत्येक घटकांचा विकास कसा होईल, याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे, गावात फक्त  सिमेंटचे रस्ते झाले, म्हणजे गावचा विकास होत नाही, तर विकासाची व्याख्या व संकल्पना व्यापक आहे, ती आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. गावचा विकास आराखड्यातून गावच्या शेवटच्या घटकातील लोकांच्या कल्याणाचा विचार व्हावा. तो विकास सामुदायिक रीतीने गावच्या विकास वृद्धीसाठी पूरक ठरेल या बाबीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे".
To Top