निवेदक विठ्ठल पवार यांना राज्यस्तरीय आदर्श निवेदक पुरस्कार.

Maharashtra varta

 निवेदक विठ्ठल पवार यांचा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव  :-आमदार संजय केळकर.

दैनिक नवकेसरीच्या वर्धापनदिनी महाराष्ट्र राज्यातील गुणवंतांचा गौरव समारंभ संपन्न.



ठाणे(प्रतिनिधी):- टी यादव. 

निवेदक विठ्ठल पवार यांचे आजच्या या गौरव समारंभ निमित्त सूत्रसंचालन ऐकले .भारदस्त आवाज, शब्द फेक,चपलखता,  प्रसंगांनुरूप बोलण,सुभाषित,वाक्ये,म्हणी वाक्यप्रचार आदींचा सुयोग्य अचूक वापराने कार्यक्रमास विशेष उंची देण्याचे काम निवेदक विठ्ठल पवार करीत आहेत, आज नवकेसरीच्या पंधराव्या वर्धापनदिनी अशा अचूक व विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध  करणाऱ्या  व्यक्तीचा सन्मान होतोय, याचा मला खूप आनंद होतोय. निवेदक विठ्ठल पवार यांचा सन्मान हा त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा आहे, असे प्रतिपादन ठाणे नगरीचे आमदार व भाजपाचे नेते संजय केळकर यांनी केले.


ठाणे या ठिकाणी नव केसरी वृत्तपत्र आणि नव केसरी वृत्तवाहिनीचा पंधरावा वर्धापन दिन तथा गौरव संध्या 2022 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 48 गुणी जणांना गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले, महाराष्ट्रातला आदर्श निवेदक म्हणून विठ्ठल पवार यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी सन्मान गौरव संपन्न झाला, दैनिक नवकेसरीचे संपादक सागर पाटील म्हणाले की, निवेदक विठ्ठल पवार ज्याब कार्यक्रमात निवेदन करत असतात, त्या कार्यक्रमाची उंची वाढत असते .निवेदक विठ्ठल पवार हे ओघवत्या शैलीमध्ये व प्रभावी आणि परिणामकारक शब्दांमुळे कार्यक्रमाला उंची देण्याचे काम करीत असतात .निवेदक विठ्ठल पवार यांचे निवेदनातील स्पष्ट शब्द उच्चार ,शब्दातील अचूकता, व त्यांच्याकडे असणारे शब्द भांडार ,आवाजातला चढउतार यामुळे कार्यक्रम प्रभावी होत असतो, महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ,सहकार कृषी, क्रीडा तथा विविध सामाजिक उत्सव कार्यक्रम सन्मान सोहळे, उद्घाटन समारंभ लग्न समारंभ, वाढदिवस आदि कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करीत असतात,


या कार्यक्रमासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर ,नवकेसरीचे संपादक सागर पाटील, सहसंपादक दीपक यादव, व्यवस्थापकीय संचालक  तांबट ,उपसंपादिका सीमाताई रजपूत ,सहसंपदिका रेश्मा पवार ,स्नेहल सागर पाटील ,धनंजय देशपांडे, वैशाली सागर पाटील व विविध मान्यवर पदाधिकारी व गुणवंत यावेळेस कार्यक्रमास उपस्थित होते.

To Top