नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा.
नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, डॉक्टरांना.
नसरापूर (प्रतिनिधी):-
नियोजनाचा अभाव असेल तर चांगल्या निर्णयाचेही तीन तेरा कसे वाजू शकतात, याचं उदाहरण समोर आलं आहे. भोर तालुक्यातील नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात या सरकारी आरोग्य केंद्रात औषधे यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, याला जबाबदार कोण आहे?. असा प्रश्न भोर,वेल्हा मुळशी रिपब्लिकन सेनेचे विधानसभा अध्यक्ष किशोर अमोलिक यांनी केला आहे .
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधे नसल्यामुळे रुग्णांना ती देता येत नाही, त्यामुळे येथील डॉक्टर यांना नागरिकांच्या रोषाला विनाकारण सामोरे जावे लागत आहे,
प्रत्येक सरकारी दवाखान्याच्या बाहेर अनेक औषधाची दुकानं असतात. पण सध्या औषधांच्या तुटवड्यामुळे मेडिकलसमोर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी दिसून येते. स्वस्तात ट्रीटमेंट होणार, स्वस्तात औषधे मिळणार म्हणून रुग्ण दुरदुरून या प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर येथे वैद्यकीय सेवा घ्यायला येतात. पण तिथे आल्यावर फरफट होत आहे. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितलं जात आहे. काही महत्त्वाचे औषध सरकारी दवाखान्यात मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. कमी खर्चात उपचार होणार म्हणून आलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना दररोज मानसिक आणि आर्थिक त्रास सोसावा लागत आहे.
येत्या दहा दिवसात नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा नियमित पुरवठा वरिष्ठ विभागाकडून झाला नाही तर रिपब्लिकन सेनेचे तीव्र निदर्शन करण्यात येणार आहे, असा इशारा भोर वेल्हा मुळशी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर अमोलिक यांनी दिला आहे

