आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करंदी खे .बा. ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सन्मान सोहळा संपन्न.

Maharashtra varta

 आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करंदी खे .बा. ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सन्मान सोहळा संपन्न.



भोर (प्रतिनिधी):-

भोर ,वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते व राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव सौ.स्वरूपाताई संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत करंदी खे.बा. ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सन्मान करत अभिनंदन करत गावच्या विकास वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळेस करंदी खे.बा.चे नवनिर्वाचित सरपंच नवनाथ मधुकर गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य  कोमल अमोल गायकवाड, अनिल गायकवाड व गोळे प्रयाग अशोक, आशालता दत्तात्रय बोरगे ,किरण कोंढाळकर आदींचा सत्कार करण्यात आला.

भोर तालुका ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा जाहीर सत्कार समारंभ राजगड ज्ञानपीठ भोर फार्मसी हाॅल येथे शनिवार दि.२४/१२/२०२२ रोजी सकाळी  १०:०० वा.आयोजित करण्यात आला होता. यावेळेस  बिनविरोध निवड झालेल्या व थेट जनतेतून निवडून आलेल्या भोर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील सामाजिक व राजकीय कार्यास मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

   प्रसंगी राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव सौ.स्वरूपा थोपटे, भोर पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब थोपटे, पुणे जिल्हा परिषदेचे मा.सदस्य विठ्ठल आवाळे, मा.सभापती लहूनाना शेलार, मा.उपसभापती रोहन बाठे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कृष्णाजीदादा शिनगारे, शिवाजीराव जांभुळकर, सोपानराव मस्के, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, संचालक के.डी.भाऊ सोनवणे, उत्तमराव थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, सौ.सुरेखा निगडे, सा.कार्यकर्ते अनिल सावले, भोर तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्षा गीतांजली शेटे, भोर तालुका काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेटे, आय.टी.सेलचे अध्यक्ष अनिल सावंत, किसान सेलचे अध्यक्ष संजय मळेकर, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया सेलचे सरचिटणीस तोसिफ आत्तार यांच्यासह भोर ता.काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध गावचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

करंदीचे नवनिर्वाचित सरपंच नवनाथ मधुकर गायकवाड यांनी न्यूज वार्ताशी बोलताना सांगितले की ,आमदार संग्राम थोपटे यांनी आमचा केलेल्या सन्मान हा न विसरता येण्यासारखा आहे या सन्मानामुळे आगामी काळात गावची विविध विकास कामे करण्यास आम्हाला निश्चित प्रकारे बळ व प्रेरणा मिळणार आहे..

To Top