करंदी खे.बा. ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा अभूतपूर्व विजय,
करंदी ग्रामविकास पॅनलचे दोन उमेदवार आले निवडून
नसरापूर (प्रतिनिधी):-टी पवार.
भोर तालुक्यातील बहुचर्चित करंदी खे.बा. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सात उमेदवारांसाठी व जनतेतून थेट सरपंच पदासाठीच्या तीन उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे चार सदस्य निवडून आले, तर एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे ,अशा एकूण पाच सदस्य व सरपंच पदाचे उमेदवार भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे विजयी झाले आहेत,भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने अभूतपूर्व विजय मिळविला आहे.
भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे सरपंच उमेदवार नवनाथ मधुकर गायकवाड हे विजयी झाले आहेत, तर वार्ड क्रमांक एक मधून कोमल अमोल गायकवाड, तर वार्ड क्रमांक दोन मधून अनिल बाळासाहेब गायकवाड व वार्ड क्रमांक तीन मधून गोळे प्रयाग आशोक, आशालता दत्तात्रय बोरगे हे विजयी झाले आहेत, तर करंदी ग्रामविकास पॅनल कडून वार्ड क्र 1 मधून अलका रामदास तळेकर व रणजीत बोरगे हे दोन सदस्य पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व करंदी पॅनल कडून प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत सर्व जागा चुरशीने लढल्या गेल्या होत्या,
यामध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार नवनाथ मधुकर गायकवाड यांनी सरपंच पदासाठी वर्षभर अगोदरच चांगली तयारी केली होती, गावातील लोकांशी ते मिळून मिसळून होते. सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेत आगामी काळात गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करेल याची ग्वाही दिली होती, भैरवनाथ ग्राम विकास पॅनेल ने काटेकोरपणे केलेले नियोजन, मतदाराशी गाठीभेटी,भावकी -रावकी एकत्र करणे, पाहुणेरावळ्यांचे असणारे संबंध, मतदार यांचे नातेवाईक मित्रपरिवार आदीशी संपर्क ठेवत , आगामी पाच वर्षात गावच्या विकासाची ब्लू प्रिंट आदी बाबींवरती वेगाने काम व नियोजन केल्याने भैरवनाथ ग्राम विकास पॅनेलला यश मिळाले असल्याची माहिती भैरवनाथ ग्राम विकास पॅनलचे प्रमुख यांनी सांगितले आहे,
भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे पॅनल प्रमुख म्हणून विठ्ठल दादा खाटपे,गणेशदादा गोळे,आदित्य बोरगे, महादेव काका गायकवाड ,तानाजी खाटपे, दत्ताभाऊ बोरगे,निशा सपकाळ, तुकाराम बोरगे,सुनील गायकवाड,युवराज गायकवाड, सुनिल खाटपे,सतीश सोनवणे ,तानाजी साबळे आदींनी काम पाहिले.

