करंदी खेबा ग्रामपंचायत निवडणूकसाठी विक्रमी 88% मतदान

Maharashtra varta

 करंदी खे.बा. ग्रामपंचायत  निवडणूक विक्रमी 88% मतदान.


नसरापूर (प्रतिनिधी):-

भोर तालुक्यातील बहुचर्चित करंदी खे.बा. ग्रामपंचायत ग्रामपंचायत साठी एकूण सात उमेदवारांसाठी व जनतेतून थेट सरपंच पदासाठीच्या तीन उमेदवारांचे भवितव्य आज 945 मतदान होऊन ईव्हीएम मध्ये कैद झाले आहे.

आज झालेल्या करंदी खे.बा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट सरपंच पदासाठी चे तीन उमेदवार  आणि सहा सदस्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली, एक सदस्य भैरवनाथ ग्रामविकास पॅनल चा उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे, ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण सात जागा आहेत.

भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व करंदी पॅनल कडून प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत सर्व जागा चुरशीने लढल्या गेले आहेत, आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावून मतदान केले, तीन मतदार केंद्रावर एकूण 1073 मतदारांपैकी 945 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

वार्ड क्रमांक एक मधून 487 मतदारांपैकी 438 मतदारांनी मतदान केले तर वॉर्ड क्रमांक दोन मधून 267 पैकी 233 मतदारांनी मतदान केले वार्ड क्रमांक तीन मध्ये एकूण 319 पैकी 274 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, 1073 एकूण मतदारांपैकी 945 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 88 टक्के मतदान झाले, 

करंदी खे.बा .ग्रामपंचायतीसाठी विक्रमी 89 टक्के मतदान झाले .मंगळवार दिनांक 20 रोजी भोर येथे मतमोजणी होणार आहे,कोणाच्या पारड्यात मतदारांनी विजयी कौल टाकलाय हे स्पष्ट होणार आहे, तोपर्यंत सर्व उमेदवारांसह मतदारांनाही निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

मतदार कोणाच्या बाजूने कौल देतायेत हे आता सांगणं अशक्य आहे, दोन्ही पॅनल तर्क- विर्तक लढवत आहेत, आज सायंकाळी  मतदान संपल्यावर उमेदवारांच्या किंवा पॅनल प्रमुखांच्या घरी बैठकांना ऊत आलेला दिसून आला, मतदान निवडणुकीबाबत आढावा,ढोबळ चर्चा सुरू  असताना दिसून आल्या ,

एक  सदस्य पदासाठी चा उभा राहिलेला उमेदवार याने विरोधी सरपंच पदासाठी उभा असलेल्या उमेदवाराच्या हातात आपले  निवडणूक चिन्हवस्तू देऊन माझ्याकडे लक्ष द्या, असे गोपनीय सांगितल्याची चर्चा जोरात रंगली.

To Top