बीएलओ शिक्षक कर्मचाऱ्यांचे निवडणूक आदेश रद्द व्हावेत:- भोर प्राथमिक शिक्षक समितीची मागणी.
भोर( प्रतिनिधी):-
वर्षभर बीएलओ शिक्षक हे निवडणुकीचे काम करीत असतात,18 डिसेंबर 2022 ग्रामपंचायती निवडणुका मतदान होत आहे, त्यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकी साठीचे प्रशिक्षणाचे आदेश शिक्षक कर्मचाऱ्यांना आलेले आहेत, त्यामध्ये काही शिक्षक बीएलओचे काम करीत आहे, तर त्यांचे निवडणूक आदेश रद्द व्हावे, अशी मागणी भोर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदार भोर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की बीएलओ शिक्षक कर्मचारी नियमितपणे मतदार यादीविषयी काम करीत आहेत. तरी काही बीएलओ शिक्षक यांना बी एल ओ असल्याचे माहिती देऊन देखील निवडणूक अधिकारी म्हणून आदेश देण्यात आलेले आहे, तरी आपल्या कार्यालयातील बीएलओ यादी पाहून ज्यांना निवडणूक आदेश आले आहेत त्यांचे आदेश रद्द व्हावे अशी विनंती निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
भोर चे तहसीलदार सचिनराव पाटील असे म्हणाले की, निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ कमी आहे, त्यासाठी blo आदेश रद्द करता येणार नाही, असे चित्र दिसून येते आहे, काही दिवसात ग्रामपंचायत जर बिनविरोध झाल्या तर त्यातून आपल्याला बी एल ओ वगळता येणे शक्य आहे,
यावेळेस सरचिटणीस सुरेश खोपडे ,शिक्षक नेते संजय पवार संदीप आप्पा जगताप, महेंद्र शिंदे व शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

