करंदी खे.बा. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सदस्य पदाकरिता13 जण व सरपंच पदासाठी 4 जण निवडणूक रिंगणात . फॉर्म माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र होईल स्पष्ट.

Maharashtra varta

 करंदी खे.बा. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सदस्य पदासाठी 13 जणांनी, भरले अर्ज.

सरपंच पदासाठी 4 जणांनी भरले उमेदवारी अर्ज.

फॉर्म माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र, होईल स्पष्ट.



नसरापूर (प्रतिनिधी)

करंदी खे.बा. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, एकूण 13 जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशक पत्र भरले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ,त्यानुसार वार्ड क्रमांक एक मध्ये पाच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, तर वार्ड क्रमांक दोन मध्ये चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, वार्ड क्रमांक तीन मध्ये चार जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तर सरपंच पदासाठी चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. एका गटाने अचूकपणे उमेदवाराच्या संख्येच्या प्रमाणात फॉर्म भरले आहेत तर दुसऱ्या गटांनी डमी फॉर्म देखील भरले आहे ,अशी सर्व माहिती सूत्रांकडून मिळत आहे,

सध्या तरी सरपंच पदासाठी तिरंगी लढत असल्याचे आपल्याला दिसून येते, तर सदस्य होण्यासाठीची इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते आहे ,फॉर्म माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे चित्र  स्पष्ट होईल.

28 नोव्हेंबर 2022 पासून नामनिर्देशन उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, आज  दि.2 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे,अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच याबाबत आपल्याला नक्की समजेल की ,कोण  उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे.



 

To Top