ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022, मतदान मतदान अधिकारी यांचे भोर येथे पहिले प्रशिक्षण संपन्न.

Maharashtra varta

 निवडणूक नियमांचे सर्वतोपरी पालन अधिकारी व कर्मचारी यांनी काटेकोरपणे करा:- भोर तालुका निवडणूक अधिकारी सचिन पाटील.


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022,  मतदान  मतदान अधिकारी यांचे भोर येथे पहिले  प्रशिक्षण संपन्न.


नसरापूर (प्रतिनिधी)

मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक नियमांचा भंग होणार नाही. निवडणूक नियमांचे सर्वतोपरी पालन अधिकारी व कर्मचारी यांनी काटेकोरपणे करावे, असे प्रतिपादन भोर तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.

भोर येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022,  मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे भोर येथेपहिले  कर्मचारी प्रशिक्षण  भोर येथे संपन्न झाले.

याप्रसंगी भोर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील व निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी भोर राजेंद्र कचरे, नायब तहसीलदार मनोहर नांदे व आजिनाथ गाजरे आणि बापू जाधव,व मतदान  अधिकारी व  कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष यांना निदेश पुस्तिका देण्यात आली व त्याबाबत चर्चा करण्यात आली, तसेच शंकेचे निरसन करण्यात आले, मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले,  ,इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर,ईव्हीएम मशीन, मॉगपोल कसा घ्यावा व मशीन सील प्रक्रिया व तात्विक व  प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.  मतदान केंद्राची बैठक रचना व्यवस्था कशी असावी, मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी,याबाबत माहिती देण्यात आली, निवडणूक नियमांचे सर्वतोपरी पालन कसे होईल, याबाबत सविस्तरित्या मार्गदर्शन करण्यात आले.

To Top