माजी सैनिकांचे सातवे नाशिक येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
नाशिक ( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
सन 2015 पासून सुरू केलेले माजी सैनिक संमेलन चार मराठा बटालियन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे करत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकसंध व एकात्मतेचा संदेश भावना हे माजी सैनिक जपत आहेत. त्यांचा आदर्श खरोखर वाखाणण्यासारखा व कौतुक करण्यासारखा व प्रेरणादायी आहे.
सर्वांना एकत्र आणण्याचा उद्देश असा होता की माजी सैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहत आहेत.आपण स्वतः एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही. त्या सर्वांना एकत्र आणण्याचा राजमार्ग म्हणजे स्नेहसंमेलन तथा मेळावा आहे. त्याद्वारे एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन एक दुसऱ्याचे मनोबल वाढवणे एकमेकांच्या आनंदात सुखदुःखात सहभागी होणे. धार्मिक स्थळांना भेट देणे, धार्मिक स्थळांची माहिती घेणे, हा त्यामागचा उद्देश आहे .25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी नाशिक या ठिकाणी माजी सैनिकांचे सातवे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले एक विचाराने, एक मनाने आणि सर्वांनी एकतेची वज्रमूठ बांधत या संमेलनात महाराष्ट्रातील 140 माजी सैनिकांचा समावेश होता. यामध्ये जे लष्कर सेवेतून 30 ते 35 वर्ष सेवा करत निवृत्त झालेले झालेले असे माजी सैनिक या संमेलनात सहभागी झाले होते.
या दोन दिवसीय माजी सैनिकांचा मेळाव्यात ,आपला परिवार विसरत आपण सर्व सैनिक सेवेमध्ये आहोत, अशी जाणीव माजी सैनिकांना यावेळेस झाली.

