अपघातात मृत पावलेल्या अनोळखी व्यक्ती बाबत माहिती असल्यास त्वरित राजगड पोलीस स्टेशनची संपर्क साधा.

Maharashtra varta

 अपघातात मृत पावलेल्या अनोळखी व्यक्ती बाबत माहिती असल्यास त्वरित राजगड पोलीस स्टेशनची संपर्क साधा.






खेड शिवापुर (प्रतिनिधी):-

9 मार्च  2022 रोजी पुणे सातारा महामार्गावरती हॉटेल कैलास समोर रात्री साडेनऊच्या सुमारास रस्ता क्रॉस करताना झालेल्या अपघातामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता.आठ महिन्यापूर्वी झालेल्या या अपघातामध्ये या अनोळखी व्यक्तीस वय अंदाजे 50 वर्ष असून धडक देऊन वाहन चालक पसार झाला होता. यात अपघाताग्रस्त  व्यक्तीच्या पोटाला व डोक्यात गंभीर स्वरूपाचे  इजा झाल्याकारणाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला  होता.  घटनेच्या वेळी सदर व्यक्ती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती किंवा ओळखीचा पुरावा पोलिसांना मिळाला नाही. 

आठ महिने उलटल्यानंतरही सदर व्यक्तीच्या बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती किंवा ओळखीचा व नातेवाईक यांची कुठली ही माहिती राजगड पोलिसांना मिळालेली नसून सदर व्यक्ती बद्दल कोणाला काही माहीत असल्यास अन्यथा व्यक्ती परिचयाची असल्यास तात्काळ राजगड पोलीस स्टेशन किंवा राजगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन राजगड पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.

 यासाठी राजगड पोलीस स्टेशन फोन नंबर 0 21 13- 272 233 व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे मोबाईल नंबर 97 63 00 51 00 असे आहे.

To Top