शिवम फिटनेस क्लब चे भव्य- दिव्य उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न..

Maharashtra varta

 शिवम फिटनेस क्लब च्या माध्यमातून आपल्या आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत :-साहित्यिक लक्ष्मण शिंदे..

 शिवम फिटनेस क्लब चे  भव्य- दिव्य उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न.. 



नसरापूर (प्रतिनिधी):

आरोग्य हीच खरी संपत्ती व आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. आरोग्याची त्रिसूत्री लक्षात घेत दिनेश शिंदे यांनी ''ना नफा ना तोटा" या तत्त्वावर शिवम फिटनेस क्लब उभारले आहे .सर्वसामान्यांना परवडेल, अशा माफक दरात फिटनेस क्लब मध्ये सवलतीच्या दरामध्ये आरोग्याचे धडे दिले जाणार आहेत.शिवम फिटनेस क्लब च्या माध्यमातून आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास  मदत होईल. असे मत  प्रसिद्ध साहित्यिक व वनाधिकारी लक्ष्मणराव शिंदे  यांनी व्यक्त केले.

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील चेलाडी ता.भोर  या ठिकाणी शिवम फिटनेस क्लबचे भव्य उद्घाटन संपन्न झाले त्याप्रसंगी साहित्यिक शिंदे बोलत होते.  पितृतुल्य व्यक्तिमत्व बाळासाहेब (नाना) शिंदे आणि त्यांच्या पत्नी  माई शिंदे यांच्या शुभहस्ते फीत कापून व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवम फिटनेस क्लबचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ संजय जगताप, महेश दादा मरळ, उद्योजक नानासाहेब शिळीमकर, देवदत्त आबा कोंडे खंडाळा तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख भूषण शिंदे शुभांकर जाधव, देगाव चे सरपंच शिवाजी यादव नायगावचे माजी उपसरपंच तानाजी खुटवड, उद्योजक शुभम मरळ, रुबाब कलेक्शनचे निखिल भंडारी, शिवाजी कोंढाळकर, शिवाजीराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संभाजी कोंढाळकर, सचिन खुटवड ,संतोष खुटवड, नसरापूरचे मा.सैनिक अनिल राव शेटे ,सचिन परदेशी, सुधीर वाल्हेकर, अमोल गावडे ,श्री.आल्हाटे,बाबू झोरे, इरफान मुलानी, अरविंद आप्पा जाधव, भरत शेठ मरळ, नंदू शेठ घाटे, गणेश आबा खुटवड उद्योजक राजू पवार ,डॉ.भुतकर, डॉ. आव्हाड, विजू काका जंगम, कैलास लष्कर, प्रशांतबापू जगताप, नामदेवराव चव्हाण, संदीप कदम, पत्रकार बाळू शिंदे, बंटी जाधव, गणेश जाधव ,कुणाल वाल्हेकर, भोर वेल्हे, हवेली, मुळशी, वाई, सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातले मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत शिवम फिटनेस क्लबचे प्रोप्रायटर दिनेश शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब (नाना शिंदे) यांनी केले ,तर उपस्थितांचे आभार धनंजय शिंदे यांनी मानले.


To Top