न्यूज वार्ता दिवाळी अंक.
तुमच्या हाती दिवाळी अंक देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
गेली तीन वर्षापासून पुणे जिल्ह्यातील व भोर,वेल्हे आणि हवेली तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय, सहकार ,कृषी ,क्रीडा ,सांस्कृतिक उद्योग, व्यापार ,शेती आदी विविध क्षेत्रातील समस्या व वेध घेणाऱ्या सामाजिक विश्लेषण करणाऱ्या बातम्या #न्युज_वार्ता पोर्टलने निर्भीडपणे मांडल्या, त्या सोडवण्यासाठी देखील न्यूज वार्ता प्रयत्नशील राहिले.
ऑनलाईन बातमींच्या माध्यमातून पाठपुरावा करत गेलो, कोविड काळामध्ये सर्वात अधिक वृत्तांकन करण्याचं प्रामाणिकपणे काम न्यूज वार्ता वेब पोर्टलने केलेले आहे.
आज न्यूज वार्ता वेब पोर्टलला जवळपास पावणे तीन लाख वाचकांनी या पोर्टलला भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केलेले आहेत
दिवाळीचा औचित्य साधत न्युज वार्ताने डिजिटल सोशल मीडिया वेब पोर्टल सॉफ्ट व हार्ड कॉपी अंक प्रकाशित करत बातम्या,साहित्य,विचार,लेख जाहिरातीच्या माध्यमातून विशेषांक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच प्रेम आपले उत्तरोत्तर न्यूज वार्ता पोर्टला मिळत राहो, अशी आशा आम्ही बाळगतो ,पुन्हा एकदा दीपावली सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
सौजन्य:- न्यूज वार्ता वेब परिवार.


















