शारदा शेतकरी माता अर्थ सहाय्य योजनेमधील वंचित लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवावे - चंद्रकांत बाठे.

Maharashtra varta

 शारदा शेतकरी माता अर्थ सहाय्य योजनेमधील वंचित लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवावे - चंद्रकांत बाठे.


भोर (प्रतिनिधी): न्यूज वार्ता नेटवर्क.

पुणे जिल्हा परिषदेची शारदा शेतकरी माता भगिणींना अर्थ सहाय्य करणेबाबतची योजना अतिशय लाभदायक असुन ती विधवा शेतकरी महिला, घटस्फोटीत शेतकरी महिला, परितक्त्या शेतकरी महिला व निराधार शेतकरी महिलांना शेतीच्या कामकाजासाठी फायदेशीर आहे. या योजनेच्या लाभापासुन अजुनही बहुसंख्य शेतकरी महिला भगिनी वंचित असल्यामुळे पुणे जिल्हा परिषदेने वंचित लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवावेत अशी मागणी मा. आदर्श जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे यांनी केली. 

मौजे किकवी ता. भोर पंचकोशीमधील शारदा शेतकरी माता भगिनींना योजनेचे अनुदान मंजुर पञ वाटपाचा कार्यक्रम प्रसंगी चंद्रकांत बाठे बोलत होते.

भोर तालुक्यातील सुमारे २८८ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या संकल्पनेतुन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातुन किकवी पंचकोशी तसेच भोंगवली पंचायत समिती गणामधील विविध गावांतील गरजु लाभार्थ्याचे अर्ज भरून ते पंचायत समितीमध्ये जमा करण्यात आले होते . त्यापैकी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना मंजुरपत्रे वाटप करण्यात आली.

याप्रसंगी मा. आदर्श जि प सदस्य चंद्रकांत बाठे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गणेश निगडे, सरचिटणीस प्रकाश तनपुरे, सुर्यकांत अहिरे, गोपाळ कोंढाळकर, नारायण भिलारे, भोर तालुका कबड्डी असोसिएशनचे संभाजी पाटणे, गोपाळ अहिरे, अर्जुन अहिरे मान्यवर उपस्थित होते.

To Top