शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काँग्रेसच्या रेखा गोसावी यांची बिनविरोध निवड.
खेडशिवापुर (प्रतिनिधी):-न्यूज वार्ता नेटवर्क
भोर तालुक्याचे पहिले प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या शिंदेवाडी गावच्या उपसरपंच पदी काँग्रेसच्या रेखा रामचंद्र गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव सौ.स्वरूपाताई संग्राम थोपटे यांच्या हस्ते रेखा गोसावी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला .
शिंदेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच रोहिणी मारुती गोगावले यांनी ठरलेल्या मुदतीत उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.
गुरुवारी दि. 10 रोजी पार पडलेल्या निवड प्रसंगी रिक्त पदासाठी रेखा गोसावी यांचा एकमेव अर्ज झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ झोळ यांनी काम पाहिले.
यावेळी सरपंच अभिजीत शिंदे मावळत्या उपसरपंच रोहिणी गोगावले, ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे, प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, वैशाली चौधरी, शारदा शिंदे, शितल जगताप हजर होते .
निवडीनंतर बोलताना उपसरपंच रेखा गोसावी यांनी महिला सक्षमीकरण आणि गावच्या विकास कामाला गती देणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वेळूचे आदर्श मा. सरपंच ज्ञानेश्वर पांगारे, वेळूचे सरपंच अमोल पांगारे ,युवक काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष महेश टापरे, बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ निगडे, सचिन जाधव, यशवंत शिंदे ,विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक वाडकर, व्हॉईस चेअरमन बुद्धिवान गोसावी, सोमनाथ सोमानी, युवा नेते हनुमंत शिंदे लक्ष्मणअप्पा शिंदे, भोर तालुका काँग्रेसचे माजी युवक उपाध्यक्ष निलेश गोसावी, शिंदेवाडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सदाशिव शिंदे, पांडुरंग चौधरी, मयूर गोसावी, भावेश गोसावी, अनिकेत शिंदे रोहित शिंदे ,योगेश शिंदे ,सागर शिंदे, पांडुरंग गोगावले, सुनील गोसावी, राजेंद्र गोसावी, किरण गोसावी, गणेश गोसावी उपस्थित होते.
राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव सौ.स्वरूपाताई थोपटे यांनी रेखा गोसावी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत ,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व गावच्या विकासाचे प्रश्न असतील तर ते सांगा, त्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल.


