नवनाथ अप्पा गायकवाड यांनी भाऊबीजेला करंदीच्या सर्व महिलांना दिली, साडी व फराळ भेट..

Maharashtra varta

 नवनाथ अप्पा गायकवाड यांनी  भाऊबीजेला करंदीच्या सर्व  महिलांना दिली, साडी व फराळ भेट..


नसरापूर (प्रतिनिधी) :

 करंदीचे  युवा सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आप्पा गायकवाड यांनी दिवाळी सणाच्या शुभेच्छा कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

यामध्ये नवनाथ अप्पा गायकवाड  हे नागरिकांना  व महिलांना दिवाळीच्या शुभेच्छाही देत आहेत. या शुभेच्छा देत असतानाच त्यांनी करंदी खे.बा.च्या सहाशे महिलांना भाऊबीज निमित्त ओवाळणी म्हणून साड्यांची भेट दिली. व दिवाळी फराळ प्रत्येक कुटुंबाला दिला आहे.

गावातील नागरिक व महिलांनी  टाळ्या वाजवत त्याचे  उपक्रमाचे स्वागत केले.

To Top