भोरमध्ये औद्योगिक वसाहत नसल्याने वैभव धाडवे पाटील मित्र परिवार यांनी राबविला उद्योजक मेळावा उपक्रम.
कापूरहोळ (प्रतिनिधी) :-
भोर तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने रोजगाराचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. तालुक्यात बेरोजगारांचा प्रश्न सुटावा ,युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे,या हेतूने सामाजिक बांधिलकी जपत वैभव धाडवे या युवा सामाजिक कार्यकर्त्याने उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले होते.
उद्योजक मेळाव्याचे आयोजन रविवारी (दि. १६) भोर तालुक्यातील पांडे येथे करण्यात आले. दीड हजाराहून अधिक नागरिक या मेळाव्याला उपस्थित होते .या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांचे थेट वंशज प्रा.नामदेवराव जाधव होते त्यांनी उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. यावेळी उद्योग कोणत्या पद्धतीने करावा, तसेच कच्चामाल थेट न विकता त्यावर प्रक्रिया करून विकल्यास अनेक पटीने फायदा कसा होतो याची त्यांनी काही उदाहरणे दिली.
याप्रसंगी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगड पोलीस ठाण्याचे पो. नि. सचिन पाटील, भाजपाचे , बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, विलास बांदल, , योगेश गाडे, तसेच ग्रामीण भागातील तरूणवर्ग, महिला बचत गट सदस्य, अनंत दूध उद्योग समूहाचे नितीन थोपटे, आनंद उद्योग समूहाचे लखन दळवी, जय महाराष्ट्र उद्योग यांनी समूहाचे अमित गाडे तसेच परिसरातील सरपंच व आजी माजी पदाधिकारी,महिला बचत गट उपस्थित होते.
वैभव धाडवे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, इथल्या युवकांनी नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायातून स्वतःची प्रगती साधा, उद्योग क्षेत्रातून आपलं कर्तृत्व सिद्ध करा असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

