युवकांनी उद्योग क्षेत्रात कर्तुत्व दाखवावे :-सरपंच पंकज बाबी गाडे
कापूरहोळ येथे आयआयएफएल शेअर मार्केटच नूतन कार्यालय.
नसरापूर (प्रतिनिधी)
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता, स्वतःच्या ज्ञानाच्या व संपर्काच्या बळावर उद्योग व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध करता येते, त्यातीलच एक भाग शेअर मार्केटचे ज्ञान घेत व त्यातील अनुभवाच्या बळावरती आर्थिक उभारी घेणारा युवक चंदन ठोंबरे हा आपल्या सगळ्यांसमोर आदर्श आहे असे प्रतिपादन कापूरहोळचे सरपंच पंकज उर्फ बाबी गाडे यांनी केले.
आय. आय. एफ. एल शेअर मार्केट ऑफिस कापूरहोळ येथील उद्घाटन समारंभा प्रसंगी सरपंच पंकज बाबी गाडे बोलत होते,याप्रसंगी सरपंच पंकज गाडेशेखर ठोंबरे ,वैशाली ठोंबरे,नागरिक ग्रामस्थ युवक उपस्थित होते.
आयआयएफएल शेअर मार्केटच्या कापूरहोळ येथील ऑफिसमध्ये आयआयएफएल फ्रँचायझी, शेअर बाजार मार्गदर्शन, क्लासेस म्युच्युअल फंड, एसआईपी, एफडी, आदी वरती मार्गदर्शन केले जाणार आहे त्यासाठी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदन ठोंबरे यांनी केले आहे.
चंदन ठोंबरे यांनी सुरू केलेलं हे शेअर मार्केट निश्चितपणे सामाजिक उपयुक्ततेच माध्यम होणार आहे. त्याबद्दल चंदन ठोंबरे यांचे अभिनंदन करत उद्योजक दादा उकिरडे यांनी शुभेच्छा दिल्या.
