राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी येथील अभियांत्रिकी प्रकल्प विद्यार्थ्यांची सृजनशील वाढविणारे:- आमदार संग्राम थोपटे .
नसरापूर (ता. 30 ) :-
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विचार ,भावभावना,नाविन्यता , अभिव्यक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचा परिपाक म्हणजे राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी येथील अभियांत्रिकी प्रकल्प आहे.ते प्रकल्प विद्यार्थ्यांची सृजनशक्ती वाढविणारे आहे, असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
इंजिनिअरिंग डे ( अभियंता दिवसा) चे औचित्य साधून त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडीचे श्री छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे करण्यात आले होते.त्याप्रसंगी आमदार थोपटे बोलत होते.
राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी चे श्री. छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विदयार्थ्यांनी इंजिनिअरिंग प्रोजेक्ट सादर केले ,त्यामध्ये विशेषकरून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून रोबोटिक्स आणि ऍटोमेशन ,अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाकडून डॅम, एरिगेशन सिस्टीम,वास्तुशास्त्र ,ब्रिजेस तसेच ग्रीन बिल्डिंग त्याचप्रमाणे कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभागाकडून डिजिटल इंडिया,होम ऑटोमेशन ,सायबर सिक्युरिटी,स्मार्ट ऍग्रीकल्चर तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाकडून डाटा सायन्स,आर्टिफिशल इंटिलिजन्स,सौर उर्जेवर चालणारी उपकरणं, आयओटी अशा प्रकारचे अत्याधुनिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले,इंजिनिअरिंग अर्थात अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे प्रोजेक्ट हे अत्याधूनिक युगाशी निगडीत होते,विद्यार्थ्यांच्या कला गुणांना तसेच क्रियाशीलतेला वाव मिळावा याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे तंत्र कौशल्य वाढावे या उद्धेशाने इंजिनिअरिंग डे ( अभियंता दिवसा) चे औचित्य साधून त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडीचे श्री छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या मार्फत करण्यात आले .
या कार्यक्रमाचे उदघाटन भोर, वेल्हा मुळशीचे आमदार तसेच राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळेस भोरचे तहसीलदार सचिनराव पाटील ,शिरवळ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने ,भोर पंचायत समिती चे मा. उपसभापती रोहन बाठे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी, राजगड ज्ञानपीठ चे संस्थापक अध्यक्ष लोकनेते मा. मंत्री अनंतरावजी थोपटे यांचे आशीर्वाद तसेच संस्थेच्या मानद सचिव स्वरूपाताई थोपटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. पाटील ,इस्टेट मॅनेजर राहुल खामकर व सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

