करंदीच्या विकासाची तळमळ .:-नवनाथ गायकवाड.

Maharashtra varta

 करंदीच्या विकासाची तळमळ .:-नवनाथ गायकवाड.


 गौरी गणपती देखावे स्पर्धेत परीक्षण .


नसरापूर (प्रतिनिधी):-

 करंदीकरांच्या मनातील असलेले गावचे विविध प्रश्न ते प्रश्न आगामी काळात सोडवण्यासाठी मी अधिक गतीने व लोकांचा विश्वास संपादन करून काम करणार आहे , असे प्रतिपादन करंदीखेबाचे युवा सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आप्पा गायकवाड यांनी केले.


करंदी खे.बा. तालुका भोर येथे गौरी गणपती देखावे स्पर्धा सन 2022 प्रथम द्वितीय तृतीय व सात उत्तेजनार्थ बक्षीस काढण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबास भेट देत, गौरी गणपती देखावे स्पर्धेचे परीक्षण नवनाथ आप्पा गायकवाड व मित्रपरिवार यांच्या वतीने सुरू आहे, त्याप्रसंगी नवनाथ आप्पा गायकवाड बोलत होते ते पुढे म्हणाले की गावातील लोक आणि त्यांच्या गावच्या विकासाचे असणारे स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी मी सामाजिक उपक्रमातून आपल्याला भेटतोय गावचे प्रश्न महिलांचे प्रश्न समजावून घेतोय.

To Top