शाळा निगडे खे.बा. येथे महिला व किशोरी मेळाव्याचे आयोजन .

Maharashtra varta

 शाळा निगडे खे.बा. येथे महिला  व किशोरी मेळाव्याचे आयोजन 

मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.



नसरापूर (प्रतिनिधी)

भोर तालुक्यातील निगडे खे. बा. येथील स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधत,एक आदर्श व प्रभावशाली उपक्रम म्हणून  जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी किशोरी हितगुज  व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनींशी या  मेळाव्याद्वारे सुसंवाद साधण्यात आला. 

डॉ.पूजा खुटवड  यांनी या मेळाव्याद्वारे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करून किशोरवयीन विद्यार्थिनींच्या शरीरात होणारे बदल व त्याचे परिणाम, नियमित येणारी मासिक पाळी, सॅनिटरी पॅडचे महत्त्व, हिमोग्लोबिन पातळी वाढविण्यासाठीचे काही उपाय, स्वच्छता आणि आरोग्यपर महत्त्वाच्या बाबी, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला.


आज अन्य उपक्रमांसह किशोरी हितगुज मेळाव्याची खऱ्या अर्थाने गरज असून अशा प्रकारच्या मेळाव्यांमुळे विद्यार्थिनींना काही बाबतीत मोकळेपणाने व्यक्त होता येते, अशी प्रतिक्रिया यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे  यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जिल्हा परिषद सदस्या  शलाका ताई कोंडे, राजगड पोलीस स्टेशनच्या  प्रमिला निकम व महिला पोलीस कर्मचारी, डॉ. पूजा खुटवड, आळंदे केंद्राच्या प्रभारी केंद्रप्रमुख सौ.प्रभावती कोठावळे व गावांतील ग्रामस्थ महिला ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

पाहुण्यांचे स्वागत गावच्या  सरपंच नाजुका बारणे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंदाकिनी चाचर, सूत्रसंचालन हेमलता काळे तर आभार प्रदर्शन ज्योती निगडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पंढरीनाथ धावले यांनी केले.


  या मेळाव्यात शाळेतील  विद्यार्थिनींनी चर्चेत सहभाग घेतला. राजगड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी प्रमिला निकम यांच्याशी विद्यार्थिनींनी सहज दिलखुलास संवाद साधताना सांगितले की, आम्हाला देखील तुमच्यासारखे पोलीस व्हायचे आहे, यासाठी काय करावे लागेल असे दिलखुलास विद्यार्थिनींनी प्रश्न, अडीअडचणी, शंका विचारत व मान्यवर पाहुणे यांच्याबरोबर सेल्फी घेत, या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

To Top