डॉल्बी व ,गुलाल विरहित ,
हर्षल फिड्सची श्रीकृष्णाई दहीहंडी.
नसरापूर( प्रतिनिधी)-:
शोर मच गया शोर ,देखो आया माखन चोर, एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरे हुश्शार, गोविंदा रे गोपाळा, अशी डिजे/डॉल्बीवर वाजणारी गाणे दहीहंडी मध्ये सर्रास ऐकायला मिळाली. मात्र भोर तालुक्यातील एक आगळी वेगळी दहीहंडी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे, निगडे तालुका भोर येथील "हर्षल फिड्सची श्रीकृष्णाई दहीहंडी".
या दहीहंडीत, ना डॉल्बीचा आवाज ,ना डीजेचा खणखणाट ना तरुणांइचे नृत्य. या श्रीकृष्णाई
दहीहंडीत ढोल लेझीम च्या तालावर तोंडाने गाणे म्हणणारे बाळ गोपाळ.अध्यात्मिक वातावरणात दहीहंडी फोडण्यात आली.
हलगी व लेझीमचा गजर अशा धुमधडाक्यात येथे दहीहंडी उत्सव पार पडला. हर्षल फिड्स च्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही गोकुळ अष्टमीनिमित्त दहिहंडी उत्सव संपन्न झाला. निगडे खे बा येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली.या बाळ गोविंदा पथकाला बक्षीस देण्यात आले.
हर्षल फीड्स चे प्रो.प्रा.कृष्णभक्त शिरीष तांगडे साहेब यांचे श्रीकृष्णाई गार्डन मंगल कार्यालयात आयोजित केलेली वैविध्य मात्र विचारांची व आचारांची भव्य दहीहंडी उत्सव मान्यवर व बालगोपाळ यांचे उपस्थितीत पार पडली. गोविंदा पथक व हजारो बालगोपाळ यांनी दहीहंडी चे गाणी म्हणत फेरा धरत दहीहंडी कार्यक्रम जोशपूर्ण करण्याचं काम केले.
या कार्यक्रमासाठी मुळशी व भोर तालुक्यातील,कोथरूड परिसरातील शिरीष तांगडे यांचे मान्यवर,आप्तेष्ट ,नातेवाईक ,मित्र परिवार ,निगडे ग्रामस्थ महिला ,युवक बहुसंख्येने उपस्थितीत होते. या दहीहंडी उत्सव सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी निगडे खे. बा. पंचक्रोशीतील नागरिक व पुणे शहरवासीयांनी गर्दी केली होती.
सायंकाळी भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

