भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शीख यांच्याकडून ध्वज संहिता बाबत मार्गदर्शन.
नसरापूर (प्रतिनिधी:-)
"हर घर तिरंगा अभियान'" मार्फत शिवगंगा खोऱ्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शीख यांच्याकडून पेट्रोल पंप व कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगार व कर्मचारी यास तिरंगा ध्वज वाटप करून ध्वजारोहण कसे करावे, याबाबत विशेष मार्गदर्शन करून ध्वज संहिते बाबत माहिती सविस्तरित्या सांगण्यात येऊन विशेष मार्गदर्शन करण्यात आले..
या अभियानाची सुरुवात वरवे तालुका भोर येथील पेट्रोल पंप पासून करण्यात आली.
हर घर तिरंगा स्वतंत्र च्या 75व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर तिरंगा या अभियानांतर्गत खेड-शिवापूर येथील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा शीख सहप्रमुख जसप्रीतसिंग सलुजा यांच्या पेट्रोल पंपावर तिरंगा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मुख्य अतिथि भाजपा जैन प्रकोष्ठ, प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी व पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सहसंयोजक दीपक रजपूत व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते शेकडो नागरिकांना तिरंगा वाटप करत मार्गदर्शन करण्यात आले..
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले या घटनेला "७५ वर्षे '' पुर्ण होत असल्याने यावर्षी अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र सरकारने "हर घर तिरंगा " अभियान राबविले असून या अभियानाला शिवगंगा खोऱ्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून झोपडी पासून ते महाला पर्यंत अनेकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविल्याचे दिसून आल्याची माहितीभाजपा अल्पसंख्यांक मोर्चा शीख सहप्रमुख जसप्रीतसिंग सलुजा यांनी प्रतिनिधीं बोलताना सांगितले.

