ज्यांना घर नाही ,त्यांनी ध्वज कुठे फडकावयाचा ?
भोर विधानसभा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर आमोलिक यांचा शासनाला सवाल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून साजरा केला. नागरिक अनेक सोयी सुविधांपासून वंचित असल्याची माहिती भोर विधानसभेचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर आमोलिक यांनी सांगितले आहे.
गावागावात रहिवासी म्हणून पाच वर्षे झाल्यानंतर त्याला कायमचा रहिवासी दाखला मिळतो, रहिवाशी दाखला, रेशनिंग कार्ड ,मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड अशी अनेक शासकीय पुरावे आहेत, हे सर्व भारतीय नागरिक आहेत. हा हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे.
या लोकांनी मतदानाच्या माध्यमातून या अनेक लोकांना सत्तेत पाठवलेले आहे, परंतु या लोकांची/नागरिकांची जेव्हा घरकुले मंजूर होऊन येतात, त्यावेळी गावातील पदाधिकारी अशा लोकांना घरकुलासाठी जागा देत नाही, तुम्ही जागा खरेदी करा, मग तुम्हाला घरकुल देऊ असे सांगितले जाते.
काही वंचित आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना हक्काचे घर नाही, निवारा नाही ,अश्या नागरिकांनी रहिवाशांनी तिरंगा ध्वज कुठे उभारायचा ,असा सवाल भोर,वेल्हा, मुळशी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष किशोर आमोलिक यांनी केला आहे.

