स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शाळा रांजे येथे रक्षाबंधन संपन्न

Maharashtra varta

 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शाळा रांजे येथे रक्षाबंधन संपन्न

भोर दि.११ ( वार्ताहर)

  भोर तालुक्याचे गटविकास अधिकारी स्नेहा देव व सहाय्यक गटविकास अधिकारी  राजेंद्र चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शाळा रांजे ( ता.भोर) येथे रक्षा बंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

      सरपंच  सुप्रिया जायकर, अभिजित कोंडे, अनिल जांभुळकर मुख्याध्यापक  अविनाश काटे यांच्या उपस्थितीत गावातील सर्व मुलांना तिरंगा राख्या वाटप करण्यात आल्या. तसेच गावातील सर्व नागरिकांना व गावातील कंपनीमध्ये तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले .

      जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन करून अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती केली. 

      कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक अविनाश काटे, ग्रामसेवक  भूषण पुरोहित, आदर्श शिक्षक रामदास जगताप , सूर्यकांत पवार व  रुपाली अंकम यांनी केले.

 

To Top