औद्योगिक कंपन्यांनी वेळू येथील महावितरण कार्यालयावर काढला आक्रोश मोर्चा.
खेडशिवापुर (प्रतिनिधी):-
औद्योगिक कंपन्यांना काही दिवसांपासून नियमित वीजपुरवठा होत नाही त्यामुळे कंपन्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे या मागण्यांसह कंपन्यांना वीज अखंडपणे पुरवठा करा या व इतर मागण्यांसह औद्योगिक कंपन्यांनी वेळू येथील महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. आज(गुरुवारी) महावितरण कार्यालयावर धडक मारली. सात दिवसात वीज पुरवठा नियमित न झाल्यास महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा औद्योगिक कंपनी मालकांनी दिला आहे.
यावेळेस शिवगंगा इंडस्ट्रीअल असोसीएशनच्या वतीने काकडे लेझर विनोबा काकडे, साखरपे सो, विक्रम विलासागर, राणे साहेब, कुरणी, प्रकाश काळे, जंगम, सोनबा धुळे, कुलकर्णी साहेब, श्रीधर गायकवाड,लडकि, हेंदरे साहेब व इतर कंपनीचे मालक ,गोगल वाडीचे सरपंच अशोक गोगावले ,वेळू सरपंच अमोल पांगारे, माऊली पांगारे, मा. आदर्श सरपंच अमोल पांगारे,जीवन धनावडे, मंगेश सुर्वे, श्रीपती पांगारे, ईश्वर पांगारे, दत्तात्रय पांगारे उपस्थित होते.
चौकट:-
नसरापूर महावितरण चे उपविभागीय अधिकारी नवनाथ घाटुळे यांनी सांगितले की, गेली पाच ते सहा दिवस भोर व वेल्हा हवेली तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत आहे, त्याचबरोबर प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे विद्युत खांब पडणे, तारा कट होणे ,वीजेत अडचणी येणे यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार घडत आहेत, येत्या सात दिवसामध्ये सुरळीत वीज पुरवठा होईल असे आश्वासन दिले.

