75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वेळू येथे विविध उपक्रमांचे आयोजन.

Maharashtra varta

 वेळू येथे शस्त्र प्रदर्शन, शस्त्र हाताळणी, आणि पाईप बॅन्ड डिसप्ले कार्यक्रम उत्साहात.


75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वेळू येथे विविध उपक्रमांचे आयोजन.




वेळू  (प्रतिनिधी):-

भारतीय जवान व भारतीय सैनिक हे आपल्या राष्ट्राचे गौरव आहेत, वेळू येथे आयोजित केलेला राज्य राखीव पोलीस दल बल गट क्रमांक दोन चा उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत यामुळे माहिती होणार आहे व स्वातंत्र्याचे विचार व महत्व तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा कार्यक्रम निश्चितपणाने उपयुक्त असल्याचे मत वेळू गावचे आदर्श मा. सरपंच ज्ञानेश्वर माऊली पांगारे यांनी केले.


राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ पुणे,वेळू येथे  स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव दिनी विविध उपक्रम राबविले.


पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई.यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस महासंचालक सो, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई,आणि पोलीस उपमहानिरीक्षक सो. राज्य राखीव पोलीस बल, परिक्षेत्र पुणे. मंगेश शिंदे, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ पुणे.यांच्या संकल्पनेतून राज्य राखीव पोलीस बल गट क्र २ पुणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळू आणि ग्रामपंचायत वेळू यांचे संयुक्त विद्यमाने ७५ वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर स्वांतत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव च्या निमित्ताने  राज्य राखीव पोलीस बलाची निर्मिती व कामकाज याबाबतचा माहितीपट,पाईपर बॅन्ड (वाद्यवृंद पथक) या पथसंचलन,राज्य राखीव पोलीस बलातील विविध कर्तव्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात,येणारे शस्त्र याबाबतची माहिती व उपक्रम राबविण्यात आले.


जितेंद्र शिंदे पोलीस नाईक वेळू यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल खडककर यांनी मार्गदर्शन व सूत्रसंचालन केले .विजय मालाजुरे व नामदेव दामगुडे पोलीस हवालदार यांनी शस्त्रांची माहिती दिली. पाईप बँड डिस्प्ले  पीएसआय उगल मुगले यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले Dysp  सुधीर महाले हे देखील या वेळेस उपस्थित होते.

यावेळेस वेळू गावचे सरपंच अमोल बबन पांगारे, वेळू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा गायकवाड व शिक्षक वृंद व  आदर्श मा.सरपंच ज्ञानेश्वर माऊली पांगारे, उद्योजक जीवन धनवडे ,हिरामण पांगारे, मंगेश सुर्वे, पांगारे, एग्रो चे  माऊली शेठ पांगारे, चंद्रकांत पांगारे ,दत्तात्रय पांगारे व वेळूचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 यावेळेस राज्य राखीव पोलीस दल बल गट क्रमांक दोन चे अधिकारी व पोलीस उपस्थित होते.

To Top