भोरचे विद्यार्थी संविधान साक्षर होणार .

Maharashtra varta

 भोरचे विद्यार्थी संविधान साक्षर होणार    :-

इंगवली येथे संविधान शिक्षण प्रशिक्षणास सुरुवात.



भोर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

समग्र भारतीयांचा सर्वोच्च ग्रंथ म्हणजे 'भारतीय संविधान'. भारतीय संविधानामध्ये देशाचा राज्य कारभार चालविण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये तसेच इतर बाबींचा समावेश केला आहे. भारताचे नागरिक म्हणून देशात वास्तव्य करत असताना आपले हक्क आणि कर्तव्ये या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे गरजेचे असते. आज घडीला संविधानिक मूल्यांचा जीवनात अवलंब करणारा 'संविधान साक्षर' समाज निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेतील विद्यार्थी संविधान साक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  मार्गदर्शक जे के पाटील यांनी केले.


इंगवली ता. भोर येथे गटशिक्षणाधिकारी अश्विनी  सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भोर पंचायत समिती विकास गटातील  आळंदे व कामथडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना संविधान शिक्षण कार्यशाळेचे  आयोजनाचा करण्यात आले होते. त्यातील आज  पहिला दिवस सुरू  होता.



या प्रशिक्षणात संविधान शिक्षण परिचय जे.के. पाटील  व अश्विनी गुरव यांनी संविधान शिक्षण   ,भोर व्हिजन असे घटक संदीप सावंत यांनी  घेऊन सुयोग्य मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आळंदे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे उपस्थित होत्या.


विद्यार्थ्यांच्यामध्ये संविधानिक मूल्ये रुजवण्यासाठी आणि त्यांना जवाबदार नागरिक घडवण्यासाठी संविधानाचे धडे शाळेतूनच देण्यात यावे. तथापि संविधानाची कायदेशीर भाषा आणि त्यातील कलम विद्यार्थ्याना त्यांच्या भाषेत समजावून सांगणे हे खूपच आव्हानात्मक असते. पंचायत समिती भोरच्यावतीने प्रकाशित  झालेली  'संविधान शिक्षण हस्तपुस्तिका' ही मुलांमध्ये अत्यंत सोप्या भाषेत संविधानिक मूल्ये रुजणार आहेत.,

To Top