पुणे जिल्हा परिषदेच्या झाडावर चढून प्रहार पक्ष भोर तालुक्याचे अभिनव आंदोलन.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन महिन्यात संबंधितावर कारवाई करण्याचे दिले लेखी आश्वासन.
पुणे( प्रतिनिधी)
भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे मा.अध्यक्ष संतोष मोहिते व कार्यकर्ते यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या समोर असणाऱ्या झाडावर चढत,3 तास उभे राहत अभिनव आंदोलन केले.
भोंगवली येथील डूबीच्या ओढ्याच्या कामाची खाते निहाय चौकशी होणे बाबत व मौजे रांजे धरमजाई उपबंधारेच्या कामाची खातीनिहाय चौकशी होऊन दोषींवर अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याबाबतचे हे अभिनव आंदोलन प्रहार पक्षाचे संतोष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना लक्षात घेत, पत्र देत संबंधित कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांना याबाबत कारवाई करण्याचे लेखी पत्र देण्यात आले, त्या पत्रात असे नमूद केले आहे की दोन महिन्यांमध्ये कारवाई करू असे लेखी पत्र दिले.
यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे मा.अध्यक्ष संतोष मोहिते, उपाध्यक्ष अजय कांबळे, सरचिटणीस विशाल बाठे, सदस्य महादेव वेदपाठक, जगन्नाथ सपकाळ प्रवक्ते घनश्याम निंबाळकर आणि रोहित भोसले
अध्यक्ष पुणे शहर मीनाताई धोत्रे अध्यक्ष पुणे शहर महिला आघाडी अनिता गोरे : उपाध्यक्ष पुणे शहरमनीष कांबळे : सरचिटणीस खडकवासलामतदार संघ शैनाझ शेख, कौशल्य गीजगझ व कार्यकर्ते उपस्थित होते.

