सविता प्रतिष्ठान पुणे तर्फे शाळेस दर्जेदार साहित्याचे वाटप.
भोर ( प्रतिनिधी)
दुःखाला कवटाळून बसू नका. दुःख झिडकारायला शिका. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे .शिक्षणामुळे परिस्थितीत मोठा बदल घडतो .दुःखाचा विचार केल्याने दुःख वाढते. परमेश्वर एक मार्ग बंद झाला तर नक्कीच दुसरे दार उघडल्याशिवाय राहत नाही. सविता प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन अंबाडे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे- कदम यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे शाळेतील गोरगरीब,वंचित विद्यार्थ्यांना ''सविता प्रतिष्ठान धनकवडी, पुणे यांचे मार्फत उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्याप्रसंगी केंद्रप्रमुख कोठावळे बोलत होत्या.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी खोपडे सर ,राजू कारभळ ,खंडू घोलप, उज्वला भारती व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस उत्तमराव कदम, संस्थापक अध्यक्ष मा. सविता प्रतिष्ठाण तसेच गणेश गॅलक्सी सोसायटी दत्तनगर चौक आंबेगाव या सोसायटीच्या रहिवाशांमार्फत सोसायटी प्रतिनिधी दिपक गुधाटे,संदिप शहापूरकर, ऋषीकेश गायकवाड हे उपस्थित होते.

