सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम संपन्न
भोर ( प्रतिनिधी)
दुःखाला कवटाळून बसू नका. दुःख झिडकारायला शिका. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे .शिक्षणामुळे परिस्थितीत मोठा बदल घडतो .
दुःखाचा विचार केल्याने दुःख वाढते. परमेश्वर एक मार्ग बंद झाला तर नक्कीच दुसरे दार उघडल्याशिवाय राहत नाही. सविता प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे,
असे प्रतिपादन एक नंबर ह भ प पांडुरंग महाराज चंदनशिव यांनी केले.
किवत ता.भोर येथे सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले.त्या प्रसंगी चंदनशिव बोलत होते.
पोलिस फौजदारांच गाव किवत येथे वृक्षारोपण समाजसेवक अक्षय पप्पु चव्हाण. यांचा स्वखर्चाने किवत येथे 50नारळ झाडे लावण्यात आली.या वेळी उपस्थित अक्षय पप्पु चव्हाण, आदेश दादा चंदनशिव , भरत चंदनशिव, गौरव बंटी चंदनशिव, महेश बाप्पु चंदनशिव, बबलू चंदनशिव, वैभव चंदनशिव, सुयोग चंदनशिव, अजय गाडे, सौरव चंदनशिव आदेश चंदनशिव, प्रशांत राजे शिर्के ,वसंत थोपटे, गणेश चंदनशिव ,नवनाथ चंदनशिव, अण्णा भडे, अक्षय चंदनशिव ,वेस्टीज कंपनी मॅनेजर ईश्वर चंदनशिव, अजित बाबा चंदनशिव, तानाजी बाप्पू चंदनशिव, शिवाजी चंदनशिव, शरद चंदनशिव ,बळीराम मोरे ,विजय आपा चंदनशिव, पांडुरंग चंदनशिव ,ओमकार धामुणसे, यशवंत थोपटे ,अण्णा थोपटे ,दिगंबर चंदनशिव जिल्हा परिषद शिक्षक अजिंक्यतारा तरुण मंडळ उपस्थित होते.
किवत गावच्या नावाची एल ए डी मधे पाटी बनवली .या वेळी ह भ प पांडुरंग महाराज चंदनशिव यांचा हस्ते किवतचे पाटीचे उद्घाटन केले. बसण्याचे बेंचेस प्रत्येक चौकात उभारण्यात आले.
सुंदर माझ गाव या संकल्पनेतून किवत गावच नाव उच्च स्तरावर घेऊन जाऊ, पुढील भविष्यात गावच नाव लौकीक करू, सुंदर माझ गाव या संकल्पनेतून. गावाचा विकासाच काम सर्व गावातील गावकरी मंडळी मित्र परिवार यांचे मदतीने करू,

