अनंत नगर येथे केंद्रप्रमुख यांची भेट व मार्गदर्शन.

Maharashtra varta

 अनंत नगर येथे केंद्रप्रमुख यांची भेट व मार्गदर्शन.





नसरापूर  (प्रतिनिधी) :-

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ व विकासासाठी स्वानंदी शिक्षण महत्त्वाचे आहे, भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे. स्वानंदी  शिक्षणातील प्रत्येक बाबींवर शिक्षकांनी निर्धारित लक्ष देऊन, प्रत्येक कृती कार्यक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे राबवला जावा,  शालेय पूरक साहित्याचे वापर करून विद्यार्थी अध्ययन स्तर  वाढवावा,सहज सोपे, जोडाक्षरयुक्त  शब्द विद्यार्थी सहजपणे वाचतील अशी तयारी शिक्षकांनी करून घ्यावी असे प्रतिपादन आळंदे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी केले.

 दि. 27/06/2022 रोजी  केंद्रप्रमुख सौ.प्रभावती कोठावळे  यांनी  जि. प.प्राथमिक शाळा अनंतनगर येथे सखोल भेट देऊन स्वानंदी शिक्षण व सेतू अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासणी केली.   


याप्रसंगी अनंतनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेखा सोंडकर व 
रजनी राऊत उपस्थित होते.

To Top