राजगड कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार संग्राम थोपटे तर व्हाईस चेअरमन पदी पोपटराव सुके यांची निवड.
नसरापूर (प्रतिनिधी):-
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भोर ,वेल्हा, मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध ,एकमताने निवड करण्यात आली, तर आमदार संग्राम थोपटे यांच्या कायम बरोबर असणारे व आमदारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे, त्यांच्या सामाजिक राजकीय कार्यात नेहमीच मदतीचा हात आणि सहकार्याची साथ देणारे पोपटराव सुके यांची कारखान्याचे उपाध्यक्ष पदी जबाबदारी एकमताने सोपवण्यात आली.
संचालक मंडळांच्या उपस्थित या निवडी करण्यात आल्या .संचालक मंडळाच्या बैठकीत राजगड कारखान्याच्या यंत्रसामग्री व नव्याने उभारणी करण्याचा संकल्प या वेळेस करण्यात आला ,तसेच नव्याने भांडवल देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना देण्यात आली.
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या एकूण सर्वच्या सर्व 17 जागा काँग्रेस पक्षाने मिळवल्या आहेत ,आमदार संग्राम थोपटे यांची तिसऱ्यांदा राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पदावरती एकमताने निवड करण्यात आली आहे व मागील काळात राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेले पोपटराव सुके यांच्यावर ती राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांनी टाकली आहे.
यावेळेस भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कारखान्याचे संचालक के.डी. सोनवणे, विकास कोंडे, शिवाजीराव कोंडे, दिनकर धरपाळे, प्रतापराव शिळीमकर सुभाष कोंढाळकर, सोमनाथ वचकल, अशोक शेलार ,शोभा जाधव, सुरेखा निगडे दत्तात्रय चव्हाण, सुभाष कोंढाळकर संदीप नगीने, सुधीर खोपडे,कार्यकारी संचालक सुनील महिंद, भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे, भोर वेल्हा मुळशी चे युवक अध्यक्ष महेश टापरे यांच्यासह भोर,वेल्हा मुळशी तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
राजगड सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन पोपटराव सुके म्हणाले की, राजगड कारखान्याला कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे यांच्या प्रभावशाली नेतृत्वाची अत्यंत गरज आहे. कारखान्याच्या उर्जितावस्थासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी आमच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली तर ती आम्ही सर्व संचालक मोठ्या ताकतीने, आगामी काळामध्ये पूर्ण करून ,संग्राम दादा थोपटे यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत.
जाहिरात :- राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटराव सुके .


