करंदी खे.बा. यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेस तीव्र हरकत.

Maharashtra varta

 करंदी खे.बा. यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेस तीव्र हरकत.


नसरापूर (प्रतिनिधी)

ग्रामस्थ करंदी खे.बा. यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना यास हरकत असले बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी  पुणे यांना देणार असल्याची माहिती प्रतिनिधी यांना दिली आहे. याबाबतचे निवेदन तयार केले असून ते जिल्हाधिकारी यांना देणार आहेत अशी माहिती दिलेली आहे.


 करंदी खे.बा. येथील ग्रामस्थांकडून  यांचे अर्जामध्ये असे नमूद केले आहे  की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सन २०२२ याची प्रारूप प्रभाग रचना मा.जिल्हाधिकारी यांचेकडून प्रसिध्द करणेत आलेली आहे. 


त्यानुसार सन २०१७ ची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकची प्रारूप प्रभाग रचना व सन २०२२ ची प्रारूप प्रभाग रचना यामध्ये बदल करणेत आलेला आहे. तो पुढीलप्रमाणे सन २००७  व २०१२ मध्ये करंदी खे. बा. ग्रामपंचायतीचा समावेश वेळू-नसरापूर या गटामध्ये व नसरापूर या गणामध्ये समावेश होता. सन २००७ व २०१२ मध्ये जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ४ गट व ८ गण होते. त्यामुळे ते लोकांसाठी प्रशासकीय कामकाजा साठी व दैनंदिन व्यापार, उद्योग, व्यवसाय व दळणवळणासाठी सोयीचे होते. परंतु सन २०२२ च्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार ग्रामपंचायत करंदी खे.बा. चा समावेश भोंगवली कामथडी या गटामध्ये व कामथडी या गणामध्ये समावेश करणेत आलेला आहे. 

     तरी सन २०२२ नुसार करणेत आलेली प्रारूप प्रभाग रचना हि सन २००७ व २०१२ नुसार वेळू नसरापूर अशी करणेची लोकांची मागणी आहे. व सन २०२२ च्या प्रारूप प्रभाग रचनेस लोकांची हरकत आहे. त्यामुळे २००७ व २०१२ नुसार वेळू नसरापूर प्रारूप प्रभाग रचना केलेस ते लोकांसाठी प्रशासकीय कामकाजासाठी व दैनदिन व्यापार, उद्योग, व्यवसाय व दळणवळणासाठी सोयीचे होईल व लोकांची होणारी गैरसोय दूर होईल. 


तसेच २००७ पूर्वीचा विकास आणि २००७ व २०१२ या काळामध्ये झालेला विकास २००७ पुर्वीच्या तुलनेने जास्तीचा असुन आज कामथडी गण यामध्ये करंदी खे.बा चा विकास होईलच अशी शाश्वती दिसत नाही तसेच करंदी खे.बा. महसुली आणि कामकाजासाठी तलाठी सजा देगाव आणि सर्कल सजा वेळू असुन व नसरापुर बाजारपेठ मध्यवर्ती ठिकाणी असल्याने लोकांच्या कामकाजासाठी व दळणवळणासाठी सोयीचे असुन देगाव व नायगाव या सर्कल व तलाठी सजातील गावाप्रमाणे करंदी खे.बा. हे गाव वेळू नसरापूर गट व गण यामध्ये समाविष्ट करून सन २००७ व २०१२ प्रमाणे प्रारूप प्रभाग रचना करणेची लोकांची मागणी आहे. त्यानुसार सन २०२२ च्या प्रारूप प्रभाग रचनेत बदल व्हावा अशी मागणी करंदी खे.बा. ग्रामस्थांची आहे.)


करंदी खे बा चे नागरिक व पुणे जिल्हा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक आदित्य बोरगे यांनी सांगितले की,दोन जून रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी पंचायत समिती  व जिल्हा परिषद निवडणूक गण व गट आराखडा  2022 प्रसिद्ध केला. त्यामध्ये , करंदी  खे बा.उंबरे ,कामथडी,खडकी,  या गावांचा समावेश  वेळू  -नसरापूर या जिल्हा परिषद गटामध्ये करावा ,अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी आहे.

2007 आणि 2012 च्या पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, त्या मध्ये चार जिल्हा परिषद व 8 पंचायत समितीचे गण होते. त्याप्रमाणेच आमच्या या गावांचा समावेश हा वेळू- नसरापुर  जिल्हा परिषद गटात होता, जिल्हाधिकारी यांनी आता या गावांचा समावेश कामथडी व भोंगवली या जिल्हा परिषद गटात केलेला आहे,तरी या गावांचा समावेश वेळू नसरापूर या जिल्हा परिषद  गट व गणात व्हावा, आमच्या सर्व ग्रामस्थांची व गावांची मागणी आहे.

To Top