शिवरे सोसायटी चेअरमन पदी तानाजी कृष्णा डिंबळे, तर व्हाईस चेअरमनपदी बबन पर्वती जाधव यांची निवड.

Maharashtra varta

 शिवरे  सोसायटी चेअरमन पदी तानाजी  कृष्णा डिंबळे, तर व्हाईस चेअरमनपदी बबन पर्वती जाधव यांची निवड.



नसरापूर ( प्रतिनिधी), 

शिवरे विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर  राष्ट्रवादीचा  काँग्रेसचाच झेंडा फडकला असल्याचे दिसून आले.

दि. २९  शिवरे (ता. भोर) येथे नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या होते. अध्यक्षपदी तानाजी  कृष्णा डिंबळे, तर उपाध्यक्षपदी बबन पर्वती जाधव यांची निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोरचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे, सहायक अधिकारी डोके यांनी कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित संचालक पांडुरंग लेकावळे, धनेश डिंबळे, प्रभाकर डिंबळे ,रामचंद्र डिंबळे, मनोहर डिंबळे, अजित डिंबळे ,अर्जुन डिंबळे, तानाजी डिंबळे, बबन जाधव, सोपान दळवी, अनंता गायकवाड ,कृष्णाबाई रामचंद्र डिंबळे, ताराबाई पवार हे आहेत.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदी  निवडप्रसंगी   ज्येष्ठ नेते दादा डिंबळे,मा.सरपंच  सुनील डिंबळे, रघुनाथ डिंबळे, सुभाष डिंबळे, बाळासाहेब डिंबळे, उत्तम डिंबळे, रामचंद्र डिंबळे, पंढरीनाथ डिंबळे, गणेश सुतार आदीनी अभिनंदन व  शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष तानाजी डिंबळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना सर्व शेतकऱ्यांना पोहोचवून आगामी कामकाज पारदर्शकपणे करणार आहे.

To Top