अमोल पांगारे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश संपन्न.
भोर (प्रतिनिधी)
माळेगाव चे मा. उपसरपंच व भोर तालुक्याचे युवा उद्योजक अमोल पांगारे यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भोर, वेल्हा, मुळशी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत अमोल पांगारे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळेस आमदार संग्राम थोपटे यांनी अमोल पांगारे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवनाना कोंडे, वेळू गावचे आदर्श मा.सरपंच ज्ञानेश्वर पांगारे ,उद्योजक हिरामण पांगारे ,मंगेश सूर्वे, जीवन शेठ धनावडे, शिवा मारुती गुजर, चंद्रकांत पांगारे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
समाज, राजकारण, उद्योग क्षेत्रात अमोल पांगारे यांची जनमानसात वेगळी अशी ओळख व स्थान आहे त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे.

