झाडावर सहा तास, प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिनव आंदोलन. आंदोलनामुळे प्रशासन नमल.

Maharashtra varta

 झाडावर सहा तास, प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिनव आंदोलन.

आंदोलनामुळे प्रशासन नमल.

काम व्यवस्थित पूर्ण करण्याची, दिली लेखी हमी.

 


नसरापूर (प्रतिनिधी)

नसरापुर ता. भोर  येथील चेलाडी ते नसरापूर च्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करत व नागरिक व प्रवाशी यांना होत असलेल्या प्रचंड त्रास,याचाच उद्रेक म्हणून भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने नसरापूर येथील वडाच्या झाडावर चढून सहा तास  अन्नपाणी न घेता शांततेच्या मार्गाने अभिनव आंदोलन करत, प्रशासनाचे व पदाधिकारी, यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याची दखल घेत,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी उशिरा आंदोलना ठिकाणी भेट देत, लेखी हमी दिली. आंदोलकांनी हे आंदोलन तूर्तास मागे घेतले.

प्रहार जनशक्ती पक्ष भोर यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की,चेलाडी ते नसरापूर या सिमेंट रस्ता अवघ्या पंधरा दिवसात  रस्त्याच्या कामाला चिरा पडलेल्या दिसताहेत .

वाहतूक सुरू झाल्यानंतर त्याची काय अवस्था होईल ते न सांगितलेले बरे, सिमेंट रस्त्याच्या खाली रोलिंग पिचिंग करणे गरजेचे होते ते झालेले नाही. त्या अगोदर मूळ रस्ता उकरलेला दिसत नाही. रस्त्याच्या कामावर नागरिकांच्या माहितीसाठी रस्त्याच्या कामाचा बोर्ड लावण्यात आलेला नाही.वाहतुकीचे कारण सांगून रात्रीचे काम केले जाते. त्यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येत नाही. काम चालू असताना वाहतूक नियंत्रण करणे ही ठेकेदाराची जबाबदारी असताना, वार्डन नेमणूक वाहतूक नियोजन केले गेले नाही.यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे. या संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी होऊन ठेकेदाराच्या निकृष्ट केलेलं काम पूर्ण करावयास लावणे, उर्वरित राहिलेले काम कमीत कमी कालावधीत पूर्ण करावे. बांधकाम विभागाच्या निरीक्षकास समोर करण्यात यावे. या कामाच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रहार जनशक्ती भोरचे  अध्यक्ष संतोष मोहिते यांनी आरोप केला असून ठेकेदारावर विभागाचे स्थानिक अधिकारी श्री. गाडे शाखा अभियंता यांच्याशी संगनमत केल्याचे दिसून येत आहे ,असा आरोप भोर तालुका  प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने नसरापूर येथे झाडावर चढून तीव्र आंदोलन केले.)

आंदोलनाप्रसंगी भोर पंचायत समितीचे मा. सभापती लहू शेलार, व ग्रामस्थ,ग्रामपंचायत सदस्य ,नागरिक यांनी भेट देत प्रहार पक्षाच्या आंदोलनास पाठिंबा देत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी त्यांनी मागणी केली.

या आंदोलना प्रसंगी प्रहार शेतकरी पक्षाचे भोरचे अध्यक्ष प्रमोद मोहिते, उपाध्यक्ष सचिन नवघणे, टिटेघर अध्यक्ष हनुमंत सुतार, करंजे अध्यक्ष रवींद्र तामकर ,कार्याध्यक्ष शामराव कोंडे ,वांगणी प्रहार सेवक आकाश टकले ,प्रहार सेवक बाळासाहेब शिंदे, ,दत्तात्रय मोरे, शरद लोहार, मयुरेश शिंदे, रघुनाथ डिंबळे, विकास तांबट, बाळासाहेब जाधव, दत्‍तात्रय कोंडे, बाळासाहेब जायगुडे ,पंढरीनाथ जाधव व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ,नागरिक शेतकरी  उपस्थित होते.


आंदोलना प्रसंगी राजगड पोलिस स्टेशनचा कडेकोट बंदोबस्त होता.

To Top