भावनाप्रधान अधिकाऱ्याचा सत्कार करणारे हात कुणालाच का दिसत नाहीत :-स्वीय सहाय्यक गौरव जाधव.
शेतकऱ्याचा बुलंद आवाज राज्यमंत्री ना. बच्चू कडू साहेब यांनी काल जागृक अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. अचलपूर येथील रुग्णालयास ६३.१८ कोटी रुपये उगाचच नियम GR न लावता शुद्ध हेतूने देण्यात आले .त्याकरिता एक कर्तव्यपूर्ती म्हणून हा सत्कार मंत्रालयीन दालनात करण्यात आला .
अनेकांना ही बातमी पाहायला वाचायला थोडी जडच गेली पण अंतर्मन जिवंत असणाऱ्या थोड्याच नेत्याचात बच्चू कडू हे नाव अग्रक्रमावर आहे. वास्तविक वाचकांना भडक बातम्या आवडतात तरच तो वाचतो हा गोड गैरसमज माध्यामाचां देखील झालेला आहे .त्याचे उत्तम उदाहरण Bacchu कडू .
आजवर अनेक कामचुकार अधिकाऱ्यांना कडू प्रसाद मिळाला आहे. त्यावर माध्यमात अनेक आठवडे चर्चा झाल्या. सरकारी संघटनाची चक्क मंत्रालयात बेकायदेशीर आंदोलने झाली .काही जणांनी तर बच्चू कडू यांच्यावर अट्रासिटी दाखल व्हावी म्हणून देव पाण्यात ठेवले.पण सत्य परेशान होता है पराजित नही...
मारापिठी केली तर ब्रेकिग बातमी.पण कल्याणकारी कामासाठी कर्मचारी सत्कार केला तर २ ओळी पण कुठच बोलल्या लिहल्या जात नाहीत. कलमकसाई वृत्तीमुळे अनेक संसार उध्वस्त झालेले आपण सहज पाहू शकतो उलट दिशेला उभे राहिलेले संसार बोटावर मोजता येतील. खर तर लोकशाही ही लोककल्याणासाठी उभी करण्यात आली आहे ही गोष्टच मुळात विसरली जात आहे .आपल्या केवळ सकारात्मक दृष्टीकोन मुळे एखाद्याचे आयुष्य बदलून जाऊ शकते ही भावना जेव्हा सरकारी शिपाई ते अधिकारी यांच्या मनात येणार नाही तोवर शहीद भगतसिंग यांच्या स्वप्नातला भारत उभा राहू शकणार नाही.
एकाच शासन निर्णयाचा अर्थ , माणूस बदलला की कसा बदलतो हा भाबडा प्रश्न अनेक पिळलेल्या माणसाच्या मनात येतो. श्रीमंतांना एक अर्थ गरिबांना वेगळा अर्थ हा तर सरकारी कार्यालयातील अलिखित नियम झाला आहे . वास्तविक फार मोठ्या बदलास आता व्यवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. आणि बच्चू कडू त्या पिळलेल्या समाजाचे आणि बदलत्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत.चांगल्याला चांगलेच बोलले पाहिजे आणि नाठलाच्या माथी काठी हाणलीच पाहिजे , नाही का !!!
ना.बच्चु कडू यांनी घेतलेला कालचा सत्कार हा कुण्या व्यक्तीचा नव्हता तो सत्कार होता खुर्चीवर बसलेल्या जिवंत मनाच्या प्रत्येक व्यक्तीचा , लोककल्याणकारी विचाराचा आणि असे सत्कार भाविष्यातही त्यांच्याकडून होतच राहतील .शेवटी मग "फुल घ्यायची का काटे" Choice is yours !!!

