किकवी येथे स्वच्छता मोहीम उपक्रमाला सुरुवात.
किकवी (प्रतिनिधी)
किकवी तालुका भोर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती भोर ग्रामपंचायत किकवी यांच्या संयुक्त विद्यमाने किकवी येथे स्वच्छता मोहीम अंतर्गत संपूर्ण किकवी गावाची साफसफाई करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन च्या संपर्क अधिकारी श्रीमती उज्वला शिर्के, किकवी गावचे सरपंच नवनाथ कदम ,ग्रामपंचायत सदस्य, वंदना अहिरे तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत गुरव, मुक्त आहिरे, मेघा निगडे ,स्वाती ननावरे ,राहुल पाटील, तसेच गावातील ग्रामस्थ मौला उद्दीन शेख, प्रमोद पाटणे ,अशोक राऊत ,विजया कोंढाळकर ,तसेच किकवी गावचे ग्रामसेवक भूषण पुरोहित हे उपस्थित होते.
1 मे 2022 ते 6 जून 2022 पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण किकवी गावात स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येणार आहे असे सरपंच नवनाथ कदम यांनी सांगितले.

