कांबरे खे. बा. च्या चेअरमन पदी राजाराम कोंढाळकर तर व्हाईस चेअरमन पदी संजय अमराळे.

Maharashtra varta

 कांबरे खे. बा. च्या चेअरमन पदी राजाराम  कोंढाळकर  तर व्हाईस चेअरमन पदी संजय अमराळे.



नसरापूर (प्रतिनिधी)

कांबरे खे. बा. च्या चेअरमन पदी राजाराम सर्जेराव कोंढाळकर  तर व्हाईस चेअरमन पदी संजय अमराळे यांची बिनविरोध निवड झाली.

कांबरे खे.बा. विविध विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध नुकत्याच झालेल्या विविध विकास सोसायटी च्या निवडणुकीमध्ये संचालकांच्या सर्वच्या सर्व जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या . चेअरमनपदाची निवडणुकीमध्ये श्री राजाराम कोंढाळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी श्री ढोके साहेब यांनी निवड घोषित केली. व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री संजय अमराळे  यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव श्री काळूराम जामदार यांनी काम पाहिले. निवडीनंतर सर्व संचालकांनी व ग्रामस्थांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा अभिनंदन केलं.

 निवडीनंतर चेअरमन यांनी तळागाळातील सर्व शेतकरी सभासदांच्या साठी सोसायटीच्या विविध योजनांचा लाभ सर्वान पर्यंत पोचण्याची हमी व्यक्त केली. यावेळी सरपंच सौ. शोभा आबनावे यांनी व ग्रामस्थ कांबरे खे बा यांनी सर्वांचं अभिनंदन केले  व आभार मानले.

To Top