पत्रकार दत्तात्रय बांदल यांचा नागरी सत्कार संपन्न .
भोर ( प्रतिनिधी):-
कोरोना काळामध्ये संगमनेर गावचा सुपुत्र, स्वखर्चाने ,निरपेक्ष भावनेने स्वतःची चारचाकी गाडीवर स्पीकर लावून कोव्हीड प्रतिबंधात्मक जनजागृतीचे अहोरात्र काम करत समाज रक्षणाचे व सेवेचे उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन डी. वाय. एस. पी. कार्यालय भोर व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून त्यांना कोरोना योध्दाचे सन्मानपत्र देऊन त्यांच्या उचित कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. आपल्या गावाचे नाव उज्वल करणारा आदर्श पत्रकार दत्तात्रय बांदल हा समाजासमोर एक आदर्श व प्रेरक आहे असे प्रतिपादन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
संगमनेर ता. भोर येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वराज्य मित्र मंडळाने केलेला सन्मान भूषणावह आहे.
संगमनेर गावचे पत्रकार दत्तात्रय बांदल यांचा स्वराज्य मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ संगमनेर -माळवाडी यांच्या वतीने त्यांचा नुकताच नागरी गौरव करून त्यांना त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

