भेलके महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण संपन्न.

Maharashtra varta

 माजी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतोय:- उपसचिव एल एम पवार

भेलके महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण संपन्न.





नसरापूर (प्रतिनिधी):-

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महाविद्यालय महत्वपूर्ण भाग आहे. जीवन जगायला, माणूस घडवणारी महाविद्यालय महत्वपूर्ण आहेत. महाविद्यालयाचा आपल्या जीवन जीवन जडणघडणीत मोलाचा सहभाग आहे. शंकरराव भेलके महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी, विविध क्षेत्रात तालुका  जिल्हा राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत असताना येथील प्राध्यापक व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांवर ते केलेले संस्कार, राबविलेले विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम, ज्ञान संस्कार शिदोरी च्या बळावर ते गरुडझेप घेत आहेत. आणि आपल्या महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव पवार यांनी काढले.

शंकरराव भेलके महाविद्यालयातील सन 1991 ते 2021 या एकूण  30 वर्षाच्या कालावधीत महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालयात  माजी विद्यार्थी मेळावा नसरापूर ता. भोर येथे संपन्न झाला.


 या कार्यक्रमात माजी विद्यार्थी नाम फलकाचे अनावरण, दीपप्रज्वलन, एन एस एस गीताने उपस्थितांचे स्वागत,  प्रास्ताविक, मान्यवरांचा सत्कार, मनोगते व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थी व मान्यवरांचे प्रगट मुलाखती, शंकरराव भेलके महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा परफॉर्मन्स डान्स, आभार,स्नेहभोजन, अशा वैविध्यपूर्ण घटकांनी कार्यक्रम उत्साहपूर्ण संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार, भोर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे ,ग्रामीण मुख्यालय पाषाण चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,आंतरराष्ट्रीय उद्योजक विश्वासराव सोंडकर,आंतरराष्ट्रीय योगशिक्षक चंद्रकांत पांगारे,कृषिभूषण श्यामसुंदर जायगुडे, दैनिक सकाळचे उपसंपादक सुभाषराव खुटवड , ख्वाडा व बबन चित्रपटाचे निर्माते कलाकार योगेशराव डिंबळे, भोर पंचायत समितीचे सभापती लहुनाना शेलार, नसरापूरचे वैद्यकीय अधिकारी जयदीप कापशीकर, शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार शितोळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंडे, माजी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या तत्कालीन प्राध्यापक ,माजी विद्यार्थी,  शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राध्यापक, पंचक्रोशी परिसरातील मान्यवर, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्रीपाद कोंडे, उपाध्यक्ष महेंद्र सावंत , प्रकाश जामदार ,सचिव विजय थिटे,खजिनदार संजू वाल्हेकर, धनश्री साळुंखे, संगीता कोंडे, रजनी उकरंडे, संदीप कोळपे, विक्रम कदम, अमोल मोरे, विलास तळेकर, रवी कोंडे, किशोर कांबळे, प्रमोद निगडे व इतर माजी विद्यार्थी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले, प्रास्ताविक सोमनाथ कुलकर्णी, आभार संदीप कोळपे, यांनी मानले.

To Top