नसरापूर कॉलेज मध्ये भव्य विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन.

Maharashtra varta

 नसरापूर कॉलेज मध्ये भव्य विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन.


नसरापूर (प्रतिनिधी):-

 माजी विद्यार्थी संघ नसरापूर आणि भेलके महाविद्यालय,चेलाडी यांच्या वतीने 1 मे 2022 रोजी सायं. 5 वाजता आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे स्वरूप वैशिष्टयपूर्ण असून तालुक्यातील यशस्वी व्यक्ती,विशेष कार्य करणारे माजी विद्यार्थी यांच्या प्रकट मुलाखती ,प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनोगते,सेंद्रिय शेती प्रयोग,योगा,दर्जेदार नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती,साहित्य क्षेत्र अनुभव,आरोग्य सेवा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे.वर्षभर मुलांच्या व परिसराच्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.,अशी माहिती माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्रीपाद कोंडे,उपाध्यक्ष आप्पा सावंत,संजू वाल्हेकर,प्रकाश जामदार तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी दिली असून नसरापूर कॉलेज मध्ये १९९१ पासून आजतागायत शिक्षण घेतलेल्या व घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 स्नेह भोजन व्यवस्था केली आहे.या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे.

To Top