गाऊडदरा येथे नवागत विद्यार्थ्यांचे आगमन व जंगी स्वागत

Maharashtra varta

 गाऊडदरा येथे नवागत विद्यार्थ्यांचे आगमन व जंगी स्वागत.



खेडशिवापुर , दि. (वार्ताहर) 

 गाऊडदरा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ ,पालक ,यांच्या सहकार्यातून जिल्हा प्राथमिक शाळा गाऊडदरा येथे शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढून बालकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले

पालकांच्या हस्ते फीत कापून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . विद्यार्थ्यांची नाव नोंद मध्ये वजन व उंची व  नवागतांचे स्वागत तसेच शारीरिक विकासात दोरीच्या उड्या, चेंडू फेकणे, कागदाची होडी ,चित्रात रंग भरणे तसेच बौद्धिक विकासात  लहान मोठा फरक, वर्गीकरण, वस्तू चित्र क्रम लावणे, जोड्या लावणे.

 सामाजिक व भावनिक विकासात घरातील सदस्यांची नावे, खेळ क्रिया मध्ये सहभागी होणे, स्वच्छ व नीटनेटकेपणा व धीटपणे बोलणे, भाषा विकासात चित्र पहा. गोष्ट सांगा अक्षर ओळखा अक्षरे पाहून लिहा, तसेच गणन पूर्वतयारीमध्ये कमी-जास्त ओळखणे, आकार ओळख , वस्तू मोजणी बालक-पालक मार्गदर्शन आदि उपक्रम  शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी  राबवले..

याप्रसंगी अध्यक्ष बापू गुलाब सुर्वे, उपाध्यक्ष संतोष आनंदा सुर्वे ,शिवभक्त दत्ताभाऊ सुर्वे ग्रामपंचायत सदस्य उमेश आप्पा सुर्वे आदी उपस्थित होते व सर्व पालक वर्ग आणि रमेश गणेश पुरोहित, मुख्याध्यापक सौ.धन्वंतरी गुरुप्रसाद पिसेसचिन अर्जुन लोणंदकर सौ. ज्योती उमेश गाढवे,स्वाती राधाकृष्ण वाव्हळ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.


                     जाहिरात:- दत्तात्रय सुर्वे


To Top